बँक ऑफ महाराष्ट्र च्या पुणे विद्यापीठाच्या शाखेतर्फे ग्राहक-मेळावा संपन्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बँक ऑफ महाराष्ट्र च्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शाखेतर्फे नुकताच विद्यापीठातील ग्राहकांसाठी ग्राहक-मेळावा घेण्यात आला.

पुणे विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक विभागप्रमुख व अधिष्ठाता डॉ अरविंद शाळीग्राम यांचे हस्ते या मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले.शाळीग्राम यांनी महाराष्ट्र बँकेच्या विविध कर्जयोजनेचा फायदा जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी घ्यावा असे आवाहन केले.

मेळाव्याच्या सुरवातीला बँकेच्या पुणे विभागाचे प्रमुख प्रशांत खटावकर यांनी मेळाव्याचे उद्दिष्ट व माहिती दिली.विद्यापीठ शाखेचे शाखाव्यवस्थापक सौ वरिंदर कौर ह्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले व प्रस्तावना केली.
बँकेचे सहायक व्यवस्थापक( कर्ज विभाग)साबीर अली यांनी दृक-श्राव्य द्वारा (PPT द्वारा) गृह कर्ज, वाहन कर्ज तसेच वैयक्तिक कर्जाविषयी व फेस्टिवल ऑफर ची सविस्तर माहिती उपस्थित ग्राहकांना दिली.महा सुपर हौसिंग कर्ज योजना च्या फेस्टिवल ऑफर ची मुदत १५ नोव्हेंबर पर्यंत आहे. ग्राहकांच्या प्रश्नांना अली यांनी समाधानकारक उत्तरे दिली.

या प्रसंगी गृहकर्ज शाखेचे सहाय्यक सरव्यवस्थापक रामचंद्र रागिरी यांची मुख्य उपस्थिती होती.
बँकेचे पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी भारत भूषण यांनी सूत्र संचलन केले.

कार्यक्रमास विद्यापीठातील विविध विभागाचे प्रमुख, प्राध्यापक,कर्मचारी व महिला ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्राहक मेळावा यशस्वी करण्यासाठी सोनाली साबळे,महेश पारखी,अशोक यादव,एकनाथ घुले,विजय कदम,भारती पारगावकर,तेजल पडवळ,अभिनव पराशर, सुनील गोखले,प्रकाश देशपांडे यांनी परिश्रम घेतले.