खोट्या जाहिराती करणारे ‘सेलिब्रेटी’ जाणार तुरुंगात, सरकारने केला ‘हा’ नवीन कायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेकदा आपण जहिरात पाहून बाजारातून ते उत्पादन खरेदी करून वापरात असतो. आवडता नायक किंवा नायिका त्या उत्पादनाची जाहिरात करत असल्याने आपण ते उत्पादन वापरत असतो. मात्र वापरल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे आपल्या लक्षात येते. मात्र आता यापुढे केंद्र सरकार अशा फसव्या जाहिराती तयार करणाऱ्या कंपन्यांना मोठा चाप लावण्याच्या विचारत आहे. कोणत्याही प्रकारची उत्पादनांची खोटी माहिती, खोटी जाहिरात तयार केल्यास त्या कंपनीला तसेच त्या उत्पादनाची जाहिरात करणाऱ्या अभिनेता किंवा अभिनेत्रीवर देखील कारवाई करणार आहे.

लोकसभेमध्ये ग्राहक संरक्षण कायद्याला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे कि, कोणत्याही प्रकारच्या माध्यमांमध्ये फसवी जाहिरात केल्यास त्या कंपनीला आणि जाहिरात करणाऱ्या अभिनेत्याला अपराधी ठरवले जाईल. यामध्ये खोटी जाहिरात, खोटी गॅरंटी, त्याचबरोबर उत्पादनात वापरण्यात आलेल्या गोष्टींविषयी खोटी माहिती दिल्यास कंपनीला दंड करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. यासाठी सरकारने एका समितीची नियुक्ती केली असून यामध्ये ग्राहकांना येणाऱ्या अडचणी तसेच त्यांची होणारी फसवणूक याची दाखल घेणार आहे.

मिळेल हि शिक्षा

या कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणेनंतर आता उत्पादन निर्मात्या कंपनीला १० लाख रुपये दंडाबरोबरच २ वर्षांपर्यंतची कोठडी देखील होऊ शकते. त्याचबरोबर या उत्पादनाची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रेटीला देखील १० लाख रुपये दंड ठोठावला जाणार आहे. त्याचबरोबर या चुकीची पुनरावृत्ती झाल्यास ५० लाख रुपये आणि ५ वर्षांच्या कोठडीची शिक्षा देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या सेलिब्रेटींना कोणत्याही उत्पादनाची जाहिरात करण्यास १ वर्षांपर्यंत बंदी देखील घालू शकतात.

आरोग्यविषयक वृत्त