Pune : नगरसेवक महेश वाबळेंनी सहकारनगर मध्ये सुरू केलेल्या आठवडे बाजारास ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे – शहरातील ग्राहकांना थेट शेतातून ताजी भाजी स्वस्त दरात मिळावी. तसेच कोणत्याही दलाल आणि अडत्याशिवाय शेतकऱ्यांना माल विकता यावा, शेतकऱ्यांचा माल मध्यस्थांविना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने नगरसेवक महेश वाबळे यांनी सहकारनगर, शिंदे हायस्कूल शेजारी, तळजाई रस्ता येथे सुरू केलेल्या आठवडे बाजाराला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शनिवार दि.१० आक्टोंबर रोजी या आठवडे बाजाराचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर सरचिटणीस व एमएनजीएल चे संचालक राजेशजी पांडे याच्या हास्ते झाले कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष श्रीपादजी ढेकणे उपस्थित होते. तसेच भारतीय जनता पक्षाचे पर्वती विधानसभा अध्यक्ष जितेंद्र पोळेकर ,हरिष परदेशी, संगिता चौरे,गणेश लगस,राजेश चिटणीस ,कैलास मोरे ,नितीन लगस,भानुदास ढोबळे ,अशोक ओमबासे हे उपस्थित होते.

या बाजारांमध्ये पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांतील शेतकरी मालाची विक्री करण्यासाठी आले होते. या शेतकऱ्यांनी भाजीपाल्यासोबतच धान्य, कडधान्य आणि फळेही विक्रीसाठी आणली होती यामुळे शहरातील नागरिकांना त्यांचा घराजवळ ताजा शेतमाल मिळू लागला. त्याशिवाय कोणीही मध्यस्थी नसल्याने भाजीपाला आणि धान्याचे दरही कमी होते. त्यामुळे शहरातील नागरिक या बाजारांमध्ये खरेदीसाठी गर्दी केली होती. ग्राहकांची गर्दी लक्षात घेता दर शनिवारी सकाळी सात ते सायंकाळी सात हा बाजार सुरू राहील असे नगरसेवक महेश वाबळे यांनी सांगितले.

आठवडी बाजार हा केवळ बाजार नसून ही एक चळवळ आहे. या बाजाराला प्रभागातील नागरिकांबरोबरच परिसरातील अनेक ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून या बाजारामुळे ग्राहकांना रास्त दरात भाजीपाला व शेतकऱ्यांना रास्त भाव मिळण्यास मदत होईल.

– महेश वाबळे (नगरसेवक पुणे मनपा, प्रभाग क्रमांक 35)