ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी ग्राहक कल्याण फाऊंडेशन कटिबद्ध

केडगाव : पोलीसनामा ऑनलाईन (चंद्रकांत चौंडकर) – ग्राहक कल्याण फाऊंडेशन पुणे जिल्हा यांच्या वतीने दौंड तालुक्यातील केडगाव येथे कार्यकर्ता प्रशिक्षण व अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. ग्राहक कल्याण फाऊंडेशन ही ग्राहकांच्या न्याय व हक्कासाठी कार्यरत असणारी चळवळ आहे. ग्राहक समृद्धीचे स्वप्न उराशी बाळगून त्यासाठी ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे कार्यकते सदैव कार्यरत असतात.कार्यकर्त्यांचे कार्य अधिक प्रभावी व्हावे यासाठी संघटनेच्या क्रियाशील कार्यकर्त्यांचा अभ्यासवर्ग आयोजित केला होता.

यावेळी कार्यकर्ता आणि संघटन,कार्यकर्त्यांचा अभ्यास आणि संवाद,संघटन पदाधिकारी यांची जबाबदारी,तंत्रज्ञानाचा वापर आदी विषयावर जिल्हा अध्यक्ष संतोष काकडे,राज्य कार्यकारणी सदस्य अस्लम तांबोळी,संस्थापक अध्यक्ष तुकाराम निंबाळकर,सचिव प्रविण गव्हाणे,कार्यवाह सतीश साकोरे,राज्य कार्यकारणी सदस्य संतोष मगर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.ग्राहकांच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी ग्राहक कल्याण फाऊंडेशन कार्यकर्त्यांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी चिंतामणी गिरमकर प्रसिद्धी व प्रकाशन प्रमुख पदी,चंद्रकांत चौंडकर पुरंदर तालुका सचिवपदी,अमोल कड खेड तालुका सचिवपदी, संजय गायकवाड पुणे महानगर अध्यक्ष पदी,गोविंद खिलारे उपाध्यक्ष पदी,सुधाकर काकडे सचिवपदी,सविता सोनवणे दौंड कार्यकारणी सदस्य पदी यांची निवड करण्यात आली.यावेळी राज्य कार्यकारणी सदस्य उत्तमराव झेंडे,कोषाध्यक्ष सीताराम बेनके,विकास शितोळे आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन सीताराम बवले यांनी केले.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.