सोडलेली गॅस सबसिडी पुन्हा मिळवण्याची संधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

स्वयंपाकाच्या गॅसचं अनुदान सोडलेल्या किंवा आतापर्यंत ही सवलत न घेतेलेल्या ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे. पंतप्रधानांच्या ‘गिव्ह इट’ मोहिमेंतर्गत तेल कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना हा नवा पर्याय द्यायला सुरुवात केली. या अनुदानाचा लाभ ते पुन्हा घेऊ शकतात. असे सुमारे दोन कोटी ग्राहक आहेत. तेल कंपन्यांनी ही माहिती दिली. तेलाच्या वाढत्या भावांमुळे अनुदान सवलत सोडणाऱ्या ग्राहकांना ही सवलत सोडल्याचा पश्चात्ताप होत असेल तर त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2ec08f11-cb9f-11e8-92f1-531b2aeea62b’]

तेलाच्या दरात वाढ झाल्याने गेल्या दोन वर्षांत अनुदान नसलेल्या गॅस सिलिंडरचा दर ३८९ रुपये इतका वाढला. ही वाढ ७९ टक्के आहे. यानंतर ही सबसिडी सोडलेल्या ग्राहकांनी ती पुन्हा मिळेल का असा विचार करायला सुरुवात केली होती. अनुदानपात्र गॅस सिलिंडरचा भाव या दोन वर्षांत १७.६ टक्के वाढला आहे. म्हणजेच १४ किलोंच्या घरगुती सिलिंडरवरचे अनुदान दोन वर्षांपूर्वी ६२.९ रुपये होते ते वाडन ३७६.६ रुपये झाले. ही वाढ ६ टक्के आहे.

देशात २४.५ कोटी घरगुती गॅसचे ग्राहक आहेत. यापैकी ८.३ टक्के म्हणजेच सुमारे २ कोटी ग्राहकांना अनुदान मिळत नाही. सुमारे १.०४ कोटी ग्राहकांनी गेल्या काही वर्षांत अनुदान सवलत सोडली आहे.

[amazon_link asins=’B01L3I1BF0,B077S3Y5MQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cb7fa9f4-cb9f-11e8-987f-bbc0c93b4729′]

अनुदानाचा लाभ कसा घ्याल ?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर ‘गिव्ह इट’ मोहिमेंतर्गत तेल कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना हा नवा पर्याय द्यायला सुरुवात केली. ज्यांना अनुदान सवलत नको असेल त्यांना सुरुवातीपासूनच ही सवलत नाकारण्याचा पर्याय देण्यात आला. ज्यांना हे अनुदान मिळण्यासाठी बँकेत खाते वा आधार डीटेल्स नाहीत असेही ग्राहक अनुदान न मिळणाऱ्यांच्या यादीत आहेत.

ही सवलत मिळवण्यासाठी ग्राहकांना प्रतिज्ञापत्राद्वारे कळवावे लागते की त्यांचे वार्षिक उत्पन्न १० लाख रुपयांहून कमी आहे. आपले बँक, आधार डिटेल्सही द्यावे लागतात.

[amazon_link asins=’B079RKP9LW,B07C4RQ4L7′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’02654fc5-cba0-11e8-b950-87ea90880663′]