‘या’ तेलाचा अतिवापर ‘मेंदू’साठी घातक, ‘रिसर्च’मधील ‘हे’ 4 खुलासे आवश्य जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – आरोग्य चांगल्या राखण्यासाठी कोणते खाद्यतेल वापरावे याबाबत नेहमी कन्फ्यूजन दिसून येते. शेंगदाणा तेल, सूर्यफुलांच्या बीयांचे तेल, सोयाबीन तेल, राईचे तेल अशी विविध प्रकारची खाद्यतेलं बाजारात मिळतात. यापैकी कोणते तेल आरोग्यासाठी आणि शरीरासाठी उपयुक्त आहे, यावर खलबते सुरू असतात. अमेरिकेतील कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी सोयाबीन तेलावर केलेल्या प्रयोगातून काही निष्कर्ष समोर आले असून या तेलाच्या अतिवापराने काही दुष्परिणाम होत असल्याचे म्हटले आहे. तसे पाहिल्यास कोणतेही तेल अतिवापरल्यास दुष्परिणाम हे होतातच. मग ते कोणतेही तेल असो.

रिसर्चमधील खुलासे

1 उंदरांवर केलेल्या रिसर्चनुसार मेंदूच्या हायपोथेलेमस भागावर सोयाबीन तेलाचा स्पष्टपणे प्रभाव आढळला. मेंदूच्या याच भागात हार्मोन रिलीजसह अनेक महत्वाच्या प्रक्रिया होतात.

2 सोयाबीन तेलाने साधारण 100 जीन प्रभावित झाल्याचे आढळले.

3 सोयाबीनच्या तेलाचा कमी वापर करावा.

4 सोयाबीनचं तेल अतिसेवन केल्याने लठ्ठपणा, मधुमेह, इन्सुलिन आणि फॅटी लिव्हरची समस्या वाढलेली आढळून आली.