आर्थिक

‘कोरोना’च्या काळात खूप वाढली ‘या’ प्रकारच्या Debit Card ची मागणी ! जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना विषाणूचा धोका टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये डिजिटल व्यवहार वाढले आहेत. कोरोनाच्या काळात लोकांमध्ये कॉन्टॅक्टलेस कार्डची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा कार्ड ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे बँकांनी सुमारे 1.6 कोटी डेबिट कार्ड जारी केली आहेत.

सोशल डिस्टेंसिंगमुळे वाढली कार्डची मागणी

सोशल डिस्टेंसिंगमुळे आवश्यक वस्तू खरेदी करणाऱ्या लोकांनीही अंतर ठेवण्याची काळजी घेतली आणि कॉन्टॅक्टलेस कार्डला प्राधान्य दिले. यासह, जुनी मॅग्नेटिक स्ट्रिप असलेली कार्ड बदलण्यासाठी बँकिंग नियामकांकडून आलेल्या सूचना लक्षात घेता बँकांनी कॉन्टॅक्टलेस कार्ड बनविणे सुरू केले. बँकर्स आणि पेमेंट तज्ञांनी ईटीला सांगितले की सार्वजनिक क्षेत्रातील बहुतांश बँकांनी कॉन्टॅक्टलेस कार्ड जारी केले आहेत.

पीएसयू बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ईटीला सांगितले की कोरोना साथीच्या या काळात डिजिटल पेमेंटचा ट्रेंड वाढला आहे. यामुळे लोकांना कॉन्टॅक्टलेस कार्ड किंवा डेबिट कार्डची आवश्यकता भासू लागली आहे. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या मदत योजनांचा लाभ घेण्यासाठी बरेच नवीन ग्राहकही पुढे आले आहेत. त्यांची बँक खाती उघडली गेली आणि त्यांच्यासाठी डेबिट कार्ड जारी करण्यात आले. काही ग्राहकांनी चिप असलेल्या कार्डसाठी अपग्रेडची मागणी केली होती आणि ते मॅग्नेटिक स्ट्रिपपासून चिप असणाऱ्या कार्ड सारखे हस्तांतरित केले गेले, त्यामुळे देखील डेबिट कार्ड देण्याची संख्या वाढली आहे.

डेबिट कार्डमुळे जन धन योजनेतील लाभार्थ्यांना मिळते सुविधा

पंतप्रधान जन धन योजनेत जोडलेल्या बँक खात्याशी संबंधित मदत योजनांचे कव्हरेज वाढविण्यासाठी देखील अजून डेबिट कार्ड जारी करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या अनेक मदत योजनांमध्ये जन धन योजनेतील बँक खात्यांना प्राधान्य दिले जाते. डेबिट कार्ड असल्याने जन धन योजनेतील लाभार्थी त्यांच्या खात्यातून सहज व्यवहार करू शकतात.

Back to top button