कंटेनर पलटी झाल्याने कंटेनर चालकाचा मृत्यू

कामशेत : पोलीसनामा ऑनलाईन

भरधाव वेगात जाणा-या कंटेनर चालकाचे गाडवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर पलटी झाला. या अपघातात चालक गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि.१५) रात्री कामशेतजवळ झाला. विनायक आडगे असे मृत्यू झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे.

आडगे हा मंगळवारी रात्री कंटेनर (एमएच ०६ एक्यू ६०१०) घेऊन मुंबईच्या दिशेने जात होता. त्यावेळी कंटेनरमध्ये दोन टन सामानाचा लोड होता. भरधाव वेगात जात असताना कामशेतजवळील कारला फाटा येथे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कंटेनर पलटी होऊन काही अंतर फरफटत गेला. आडगे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. कंटेनर रस्त्याच्या बाजूला जाऊन पडल्याने आणि फरफटत जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांना धडक बसल्याने रस्त्याच्या कडेला असलेली झाडे उन्मळून पडली. कामशेत ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत.