दुचाकीला धडक देऊन पळून जाण्याच्या घाईत कंटेनर ट्रॅक्टरला ‘धडकला’, एक ठार 20 जखमी

गेवराई : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबादहुन गेवराईकडे भरधाव वेगात येणाऱ्या मालवाहू कंटेनरने दुचाकी आणि आयआरबीच्या कामावर मजूर घेऊन जाणार्‍या ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिली. या तिहेरी अपघातात एक महिला जागीच ठार तर पंधरा ते वीस कामगार जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळी 10 वाजता नागझरीजवळ घडली. पाच ते सहा कामगार गंभीर जखमी झाले असून सर्व जखमींवर गेवराई उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

औरंगाबादहुन भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने नागझरी जवळ एका दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यात आकाश मापारे (वय 22) हा तरुण जखमी झाला. भीतीने आणखी वेगात जणाऱ्या कंटेनरने अर्धा किलोमीटरवर आयआरबीच्या कामावर सिमेंट व 30 कामगार घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला जोराची धडक दिली.

या अपघातात रेखा सुरेश रावत (21, रा.गुजरात) या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे तर रमेश श्रीराम पवार ( वय 35) , देवराज मोहन (16), बिरेंद्र धारू (21), रेखा सायरिष (20), जयश राजू (20), नीता मेहता (20), नारायण मापाडी (26), अंजु रामशिंग चव्हाण (22), रावल प्रमिला (23), जयलेश रावत (13), भुरी शैलेश (13), नेहाते सुमन (40), पप्पी मेहता (18), रंजित मेहता (28), पिनू रावत (19), मिनास रावत (19), जसवंत (27), रेखा रफाळ (40), दिलीप रफाळ (19), हजू जाट रावत (40), नीता रायफळ (19), गुड्डी रायफळ (2), हितेश (2), देवा मोहन (18), धारू मोहन (21), उषा अजय (27), महेश रूपा (20), सुशील रमेश (18), रमेश धिंडे (46), शैलेश रावत (18) हे जखमी असून यांच्यावर गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉ. राजेश शिंदे यांच्यासह डॉ. काकडे, डॉ. सराफ, डॉ. गोविंद लेंडगुळे, डॉ. आंधळे, डॉ. मुक्तार, सिस्टर श्रीमती जाधव, सुगडे, खंदारे, वाळवी, माळवे, जाधव, गणेश नाईकनवरे, वखरे, पवार यांनी तात्काळ प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बीड येथे पाठवण्यात आले.