साक्षी महाराजांचे राहुल गांधींना खुले आव्हान…

लखनऊ: वृत्तसंस्था

भाजपाचे खासदार साक्षी महाराज हे आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहतात. आता त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना खुले आव्हान केले आहे. राहुल गांधी यांनी उन्नावमधून लोकसभा निडणूक लढवावी असे आव्हान साक्षी महाराजांनी दिले आहे. राहुल गांधी यांनी माझ्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवून दाखवावी. या निवडणूकीत जो पराभूत होईल त्याने राजकारण सोडायचे असे साक्षी महाराज म्हणाले. ते एका हिंदी वृत्त वाहिनीशी बोलत होते.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’dda1d492-cb07-11e8-8740-73f1bdd9164a’]

साक्षी महाराज उत्तर प्रदेशातील उन्नव मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. याच मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवण्याचं आव्हान त्यांनी राहुल गांधींना दिलं आहे. ‘राहुल गांधींनी माझ्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवून दाखवावी. यामध्ये जो पराभूत होईल, त्यानं राजकारण सोडावं लागेल,’ असं साक्षी महाराज म्हणाले. ‘राहुल गांधींनी मला पराभूत केल्यास, मी राजकारणातून संन्यास घेईन आणि राहुल गांधींचा पराभव झाल्यास त्यांनी इटलीला निघून जावं,’ असंदेखील त्यांनी म्हटलं. माझ्याविरोधात निवडणूक लढवल्यास राहुल यांचा पराभव निश्चित असेल, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.

[amazon_link asins=’B07DM324BB,B07926MCVS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ea220dc0-cb07-11e8-ab60-2597f36e71a3′]

राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बेछूट आणि तथ्यहीन आरोप करत आहेत, असं साक्षी महाराज म्हणाले. ‘पंडित नेहरुंनी फक्त चोरी केली, दरोडे टाकले. त्याशिवाय त्यांनी काहीच केलं नाही. त्यांना संपूर्ण देश उद्ध्वस्त केला. फाळणी झाल्यानंतर देशाला उद्ध्वस्त करण्यात नेहरु आणि त्यांच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे,’ अशी टीका साक्षी महाराजांनी केली.

स्वाभिमान दाखवून उदयनराजेंनी भाजपमध्ये यावं : येळगावकर

सातारा : राष्ट्रवादीकडून छत्रपतींच्या वंशजांची अवहेलना केली जात आहे. त्यामुळे खासदार उदयनराजेंनी स्वाभिमान दाखवून भाजपमध्ये यावं, असा सल्ला माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी दिला.साताऱ्यातील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. येळगावकर म्हणाले, ह्यराष्ट्रवादीकडून खासदार उदयनराजेंची आणि छत्रपतींच्या वंशजांची अवहेलना केली जात आहे. पुण्यातील बैठकीत त्यांना आठ दिवसांनी भेटायला या, असं सांगितलं जातं. हे पाहता उदयनराजेंनी आता स्वत:चा अपमान करून घेऊ नये. उदयनराजेंवर आता खऱ्या अर्थाने भूमिका जाहीर करण्याची वेळ आली आहे. त्यांनी स्वाभिमान दाखवून भाजपमध्ये पुन्हा यावे.