खबरदारी म्हणून बिग बॉस 14 चे स्पर्धक होणार क्वारंटाईन !

पोलिसनामा ऑनलाईन – छोट्या पडद्यावरच्या अनेक मालिका शोपैकी सर्वात चर्चेतला शो असलेल्या बिग बॉसमधील 14 चे स्पर्धक क्वारंटाईन होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात येणार आहे. अभिनेता सलमान खान या कार्यक्रमाचा होस्ट असल्यामुळे या शोकडे अनेकांचे लक्ष आहे. नव्या कार्यक्रमात कोण आहे, कोण नाही याची उत्सुकता अनेकांनी लागली आहे.

बिग बॉसचा सीझन 14 आता येत्या 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यानिमित्ताने सर्वच स्पर्धकांना क्वारंटाईन केले जाणार आहे. 11 दिवसांचा क्वारंटाईन पिरिएड असून 20 सप्टेंबरपासून त्यांचा हा क्वारंटाईनचा काळ सुरू होणार आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातल्या एका पंचतारांकित हॉटेलात त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. अर्थात तिथेही गोपनीयता पाळली जाणार आहे. स्पर्धक कोण आहे कुठे आहेत हे कुणालाही न कळता प्रत्येकाला घरात राहण्याबद्दल सूचना करण्यात आल्या आहेत. कोव्हिडची सध्याची स्थिती पाहता कुणालाही कसलाही धोका असून नये म्हणून ही काळजी घेण्यात येणार आहे. 11 दिवस क्वारंटाईन केल्यानंतर त्यांची कोव्हिड तपासणीही होणार आहे. त्यानंतर त्यांना ऑक्टेबरच्या 3 तारखेला थेट घरात प्रवेश दिला जाईल. सलमान खान थेट त्या घरात जाणार आहे. सलमानने या शोसाठी 250 कोटी रुपये घेतल्याची माहिती मिळाली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like