दौंडमध्ये २०१९ च्या विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू

दौंड: पोलीसनामा ऑनलाईन

दौंड तालुक्यामध्ये २०१९ च्या विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे.जो तो आपापल्या परीने विविध विकास कामांद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे.माजी आमदार आणि जिल्हाबँकेचे अध्यक्ष रमेश थोरात हे पुन्हा राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची दाट शक्यता आहे तर विद्यमान आमदार राहुल कुल हे भाजपच्या पाठिंब्यावर रासप कडून पुन्हा निवडणूक रिंगणात उतरतील असे जाणकारांचे मत आहे.गेल्या चार वर्षांत पवार कुटुंबीय बारामती नंतर सर्वात जास्त लक्ष हे दौंडवर देताना दिसत आहेत. दौंड हे आपले माहेघर असल्याचे वेळोवेळी जेष्ठ नेते शरद पवार हे सांगत आले आहेत, परंतु सध्या त्यांच्या माहेरघरावर रासप ने कब्जा केला आहे आणि ते परत मिळविण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश थोरात हे प्रयत्नशील आहेत. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, यांसह राष्ट्रवादीचे दिग्गज हे दौंडवर नजरा गाडून आहेत.

[amazon_link asins=’B071RC52N6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’54a6c139-872e-11e8-9f47-295f603a1074′]

२०१९ ची विधानसभा निवडणूक हि खऱ्या अर्थाने  आरपार ची लढाई ठरणार आहे. कारण २०१९ साली जो दौंडचा आमदार होईल तो पुढील १० ते १५ वर्षे तरी तालुक्यात आपले स्थान टिकवून ठेवील असे भाकीत वर्तविले जात आहे. रमेश थोरात आणि राहुल कुल यांच्यामधील वयाचा विचार करता दोघांच्या वयामध्ये  किमान तीस वर्षांचा फरक आहे त्यामुळे कुल हे जर निवडून आले तर त्यांना पुन्हा आमदरकीसाठी टक्कर देणारा नेता दौंड तालुक्यात सापडणार नाही तर रमेश थोरात यांनी जर २०१९ ची विधानसभा निवडणूक जिंकली तर येणारे पुढचे पाचवर्षे हे त्यांचेच असतील आणि त्यापुढे त्यांच्या माध्यमातून दौंड विधानसभेसाठी राहुल कुल यांना टक्कर देणारा एक नवीन चेहरा उदयास आणलेला पाहायला मिळेल अशी खात्री राजकीय वर्तुळातून देण्यात येत आहे. राज्यातील सध्याचे वातावरण पाहता राष्ट्रवादीला पुणे जिल्ह्यातही पोषक वातावरण तयार झाले आहे त्याचाच फायदा हा दौंड तालुक्यालाही होऊ शकतो, येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, धनगर आरक्षण, तालुक्यात भीमा पाटस कारखाना, कुरकुंभ मोरी हे प्रचाराचे प्रमुख मुद्दे असतील तर रासप कडून दौंडचा विकास आणि स्वाभिमान यावरच जास्त भर दिला जाऊन ही निवडणूक
लढविण्यात येईल अशी शक्यता आहे.

[amazon_link asins=’B01GJRMD8O’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4231daeb-8735-11e8-94e3-f7d33832a938′]

दौंड तालुका हा राजकीय उलथापालथीच्या दृष्टीने संपूर्ण पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त चर्चेत राहणारा तालुका म्हणूनच याची ओळख आहे.
कुल-थोरात या प्रतिस्पर्धी गटातील अठरा वर्षांपासूनचे असलेले राजकीय वैर सर्वश्रुत आहे. कधीकाळी एक दुसऱ्यासाठी जीवाला जीव देणारे जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात आणि कै. माजी आमदार सुभाष अण्णा कुल यांची जोडी हि तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात अण्णा-अप्पाची दोस्ती म्हणून चर्चेचा विषय बनली होती. परंतु मा.आ.कै.सुभाष कुल यांच्या आकस्मिक निधनानंतर कुल-थोरात गटामध्ये उभी फूट पडली आणि तालुक्याची संपूर्ण राजकीय समीकरणे बदलून गेली. राष्ट्रवादी ज्याला उमेदवारी देईल त्याविरोधात यातील एक गट मोठी ताकद लावायचा त्यामुळे तालुक्यात जो आमदार राष्ट्रवादीकडून उभा राहतो तो पडतो असे म्हटले जायचे परंतु २००४ साली दौंडच्या माजी आमदार रंजना कुल ह्या राष्ट्रवादीच्या चिन्हावरच निवडून आल्या होत्या तर २००९ साली त्यांचे पुत्र व विद्यमान आमदार राहुल कुल हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर उभे राहून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत करण्यात येत असलेला दावा किती खरा ठरतो हा येणारा काळ ठरवणार आहे. कुल-थोरतांसाठी मात्र २०१९ हि आरपारची लढाई असणार आहे यात शंका नाही कारण जो जिंकेल तो अनेक वर्षे राज्य करील हेही तितकेच खरे आहे.