सलग अर्धा तास फोनवर बोलल्याने होऊ शकतो ब्रेन ट्यूमर..

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

स्मार्ट फोन अभिशाप की वरदान, हा वाद स्मार्टफोनच्या उत्पती सोबतच निर्माण झाला आहे. स्मार्टफोन ही सध्या मुलभूत गरज बनली आहे. हातात काही मिनिट फोन नसेल तर जीवन सैरभैर होऊन जाते. पण जास्त फोन वापरणे हे आरोग्यासाठी धोकादायक बनत चाल आहे हे आपल्याला समजत नाही. पण, स्मार्टफोनचा अती वापर आता जीवघेणा ठरत चालला आहे. हे आम्ही नाही, तर आयआयटीच्या एका प्राध्यापकांचे मत आहे. आयआयटी मुंबईचे प्राध्यापक गिरीश कुमार यांनी केलेल्या एका अभ्यासानुसार त्यांनी असा दावा केलाय की, सलग अर्धा तास फोनवर बोलल्याने ब्रेन ट्यूमर होऊ शकते. यापुढे ते म्हणाले, तुम्ही सलग अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ फोन कानाला लावून बोलल्यास दहा वर्षांनी तुम्हाला ब्रेन ट्यूमर होण्याची शक्यता दुप्पटीने वाढतो.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7ba3bc36-c54a-11e8-8cba-a53f07941929′]

स्मार्टफोनच्या अतिवापराने शरीराचं मोठं नुकसान होते. त्यामुळे ब्रेन ट्यूमरचा धोका  बरोबरच डोळ्यांवर परिणाम होतो,  रात्रभर झोप न येणे, गॅजेट अॅडिक्शन होणे अशा त्रासांना सामना करावा लागतो. तसेच कानांनी कमी ऐकु येणे, लक्ष विचलीत होणे आदीही समस्यांचाही सामना करावा लागतो. आता यात आणखीन भर पडलीये ती, सलग अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ फोन कानाला लावून बोलल्यास दहा वर्षांनी तुम्हाला ब्रेन ट्यूमर होण्याची शक्यता दुप्पटीने वाढते. आयआयटी मुंबईचे प्राध्यापक गिरीश कुमार यांनी एका अभ्यासाच्या आधारावर हा दावा केला आहे. देशातील अनेक ईएनटी (कान, नाक, घसा) स्पेशालिस्टसोबत बातचीत केल्यानंतर हा अहवाल प्रकाशित केला असल्याचे गिरीश कुमार यांचे म्हणणे आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना फक्त १० वर्षांसाठी आरक्षण हवं होतं – सुमित्रा महाजन

बहिरेपणा आणि ब्रेन ट्यूमरच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचा उल्लेख या संशोधनामध्ये करण्यात आला आहे. जास्त वेळ फोनवर बोलल्यामुळे कान गरम होतात, असे सर्वेक्षणातील अनेकांनी मान्य केले. तर, सलग 20 ते 30 मिनिट फोनवर बोलल्यानंतर मायक्रोवेव्ह रिडेएशन्स शरीरात प्रवेश करतात, ज्यामुळे कानाच्या पाळीचं रक्त गरम होते. रक्ताच्या तापमानात एक डिग्री सेल्सियसची वाढ होते. फोनवर अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ बोलल्यानंतर डोकेदुखीची समस्या सुरु होते. त्यानंतर ब्रेन ट्यूमरच्या अंतिम टप्प्याचे लक्षणं दिसून येतात, असं संशोधनात म्हटलं आहे.

[amazon_link asins=’B075FY4RWK,B07D9G1GHB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’482a5484-c54c-11e8-a797-a7740839827a’]

जाहीरात