सतत मास्क परिधान केल्यास होवु शकते ‘एक्ने-रॅशेज’ची समस्या, जाणून घ्या यासाठी घरगुती ‘उपाय’

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोना व्हायरस महामारीमुळे मास्क आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहे. जर एखादी व्यक्ती काही काळ घराबाहेर जात असेल, तर तो मास्क नक्की लावतो. काही ऑफिसमध्ये तर ८ ते ९ तास मास्क घालणे आवश्यक आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हे फायदेशीर तर आहे, पण काही लोकांना यामुळे त्वचेची समस्याही उद्भवत आहे. सतत मास्क लावल्याने चेहऱ्यावर ऍक्ने, रॅशेस, सूज येणे आणि लालसरपणाची लक्षणे दिसत आहेत. लोक सोशल मिडीयावर या समस्येला “मास्कने” आणि “मास्क ऍक्ने” म्हणून संबोधत आहेत.

काय आहे मास्कने?
दिल्लीच्या इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयातील त्वचारोग तज्ञ व वरिष्ठ सल्लागार डॉ. डीएम महाजन यांनी सांगितले आहे की, मास्कचे काम तोंड पूर्णपणे झाकणे आहे. कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी आजकाल मास्क वापरले जात आहेत. परंतु जेव्हा दीर्घ काळासाठी सतत परिधान केले जाते तेव्हा ते मास्कच्या आत घर्षण निर्माण करते. तसेच जेव्हा लोक आपले मास्क साबणाने किंवा इतर कशानेही धुतात, तेव्हा मास्कच्या फॅब्रिकमध्ये ते थोडेसे राहून जाते. त्यामुळे लोक मुरुम, पुरळ आणि लालसरपणाची तक्रार करतात.

मास्कसह ऍक्ने रोखण्याचे मार्ग
१. सर्वात महत्वाची गोष्ट अशी की, जेव्हा तुम्ही मास्क खरेदी कराल तेव्हा फक्त योग्य फॅब्रिकचे खरेदी करा. सूती किंवा मऊ कापडाचे मास्क परिधान करणे योग्य आहे. सध्या पावसाळा आहे, त्यामुळे जाड फॅब्रिकचे मास्क घालणे टाळा.

२. फेस मास्क १ ते २ तासांपेक्षा जास्त काळ घालू नये. जर आपण खूप गर्दीच्या ठिकाणी गेलात आणि मास्क घालणे आवश्यक असेल तर तुम्ही फेस शील्ड वापरू शकता. त्यामुळे तुम्ही त्वचेच्या समस्या देखील टाळाल आणि आपलेही संरक्षण करू शकाल.

३. सूर्यप्रकाश सर्वोत्तम जंतुनाशक आहे. त्यामुळे मास्क कोणत्याही साबणाने किंवा डिटर्जंटने धुण्याऐवजी तुम्ही ते कमीतकमी चार तास उन्हात ठेवू शकता. तुमच्याकडे फेस मास्कचा एक सेट असू शकतो आणि त्यांना सूर्यप्रकाशात ठेवू शकता. उदाहरणार्थ तुमच्याकडे ५ फेसमास्क असल्यास दररोज एक मास्क परिधान केल्यावर ते उन्हात ठेवा. यामुळे मास्कमध्ये काही जंतू असतील तर ते मरून जातील.

ऍक्नेसाठी घरगुती उपाय
१. जर तुमचे मुरुम फार मोठे आणि लाल झाले असतील तर तुम्हाला त्वरित आराम मिळण्याची आवश्यकता आहे. अशात तुम्ही बाजारात उपलब्ध असलेली अँटी ऍक्ने क्रिम किंवा पिंपल्स क्रीम वापरली पाहिजे. अँटी ऍक्ने क्रीम देखील तुमच्या स्किन प्रकारानुसारच निवडा. जर ते तुम्हाला सूट करत नसेल तर ते वापरू नका.

२. हा एक घरगुती उपचार आहे, कारण कोणतेही स्किन एक्सपर्ट्स ते आपल्याला वापरण्यास सांगत नाहीत. पण ब्युटी केअर याचा सल्ला देतात. तुमच्या चेहऱ्यावर किंवा शरीरात कोठेही जास्त पिंपल्स असतील तर तुम्ही ऍस्प्रीनची गोळी बारीक करून लावू शकता. हे मुरुम काढून टाकण्यासाठी अत्यंत प्रभावी असल्याचे सिद्ध होते.

३. तुम्ही त्वचेच्या काळजीसाठी खोबरेल तेल देखील वापरता. पण टी ट्री ऑइल आणि खोबरेल तेल एकत्र मिसळल्याने देखील मुरुमांवर उपचार करू शकता.