काय सांगता ! होय, भारतात ‘या’ ठिकाणी क्वारंटाईन सेंटरमध्ये चक्क वाटले जातोयत ‘कंडोम’ आणि ‘गर्भ’ निरोधक गोळ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पल्स पोलिओ मोहिमेच्या धर्तीवर आता डोअर-टू-डोअर गर्भ निरोधक संसाधने लोकांमध्ये वितरीत केली जात आहेत. येथे राहणाऱ्या स्थलांतरितांना कंडोम पॅकेट्स आणि गर्भनिरोधक गोळ्या वितरित केल्या गेल्याचे बिहारमधील क्वारंटाईन केंद्रामध्ये दिसून आले. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बिहारच्या गोपाळगंज प्रशासनाने एक रंजक निर्णय घेतला आहे. कुटुंब नियोजन कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी आरोग्य विभागाने हा अनोखा उपक्रम हाती घेतला असून याअंतर्गत 14 दिवस क्वारंटाईनमध्ये राहिलेल्या स्थलांतरितांना कुटुंब नियोजनाची पद्धत सांगितली जात आहे. तसेच यासाठी आवश्यक संसाधनांचे वाटप देखील केले जात आहे.

महिलांना सांगितले जात आहे की इतर राज्यातील येणाऱ्या कुटुंबातील सदस्यांपासून काही दिवस दूरच रहावे. मुले आणि वृद्धांची विशेष काळजी घ्यावी. महिलांना गर्भनिरोधक गोळी (माला डी) देण्याबरोबरच कुटुंब नियोजनाबाबत विशेष लक्ष देण्यासाठी जागरूक केले जात आहे. होम क्वारंटाईनमध्ये राहणार्‍या कामगारांना आणि महिलांना लोकसंख्या नियंत्रणाबद्दल माहिती दिली जात आहे. आशा कार्यकर्ता किंवा एएनएम घरोघरी जाऊन गर्भनिरोधक संसाधने प्रदान करीत आहेत आणि त्यांना त्याच्या फायद्यांविषयी जागरूक करत आहेत. गोपाळगंजमधील फुलवारीया ब्लॉक मुख्यालयाची माध्यमिक शाळा, माडीपूर येथे उभारण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्येही असेच दृश्य दिसून आले.

येथे उपस्थित स्थलांतरित मजुरांमध्ये कंडोमचे वितरण केले जात होते. त्याचप्रमाणे क्वारंटाईन केंद्रांमधून मुक्त होऊन घरी परत जाणाऱ्या कामगारांमध्ये गर्भनिरोधक संसाधने वाटप करून त्यांना घरी पाठवले गेले. गोपाळगंजचे डीएम अर्शद अजीज यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 2 लाख 24 हजार लोकांमध्ये गर्भ निरोधक संसाधने (कंडोम) वितरित करण्यात आली आहेत. यासह 40 हजार 470 महिलांमध्ये गर्भनिरोधक गोळ्या वितरित केल्या आहेत. डीएम पुढे म्हणाले की, शाळांमध्ये बांधलेल्या क्वारंटाईन सेंटर आणि होम क्वारंटाईनमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये डोअर-टू-डोअर हेल्थ टेस्टिंग दरम्यान केअर इंडियाचे कर्मचारी, एएनएम आणि आशा कर्मचार्‍यांमार्फत प्रवाशांना कंडोम देऊन त्यांना कुटुंब नियोजनाबाबत जागरूक केले जात आहे.