गर्भनिरोधक गोळ्यांमुळे महिलांच्या आरोग्यावर होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – गर्भधारणा नको असल्यास अनेक महिला डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भनिरोधक गोळ्या घेतात. असे करणे आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाशिवाय अशा गोळ्या घेणे धोकादायक ठरू शकते. गर्भनिरोधक गोळ्यांचे अनेकदा विविध दुष्परिणामही दिसून येतात. याच दुष्परिणामांची माहिती आपण घेणार आहोत.

काही महिलांना गोळी घेतल्यानंतर नेहमी डोके दुखणे किंवा चक्कर येण्याचा त्रास होतो. कधी कधी तापही येऊ शकतो किंवा अंगदेखील दुखू शकते. असा त्रास होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. काही घटनांत गोळीच्या परिणामामुळे अर्भक पूर्णपणे शरीरातून बाहेर येत नाही. अशा वेळी शस्त्रक्रियाही करावी लागू शकते. या गोळ्या खाल्ल्यामुळे मळमळ आणि वांती होण्याच्या तक्रारी दिसून येतात. कधी कधी पोटात मुरडाही येऊ येतो. तसेच अतिसार होण्याचीही भीती असते.

गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यानंतर गर्भाशयाच्या संकुचितपणामुळे रक्तस्राव वाढू शकतो. वेळीच यावर उपाय केला नाही तर ही समस्या दीर्घकाळापर्यंत राहू शकते. यामुळे गंभीर आजार होण्याचा धोका असतो. या गोळ्या खाल्ल्यामुळे पोटात दुखू शकते. पोट, पाय आणि शरीराच्या कित्येक भागात या गोळ्यांमुळे विपरीत परिणाम दिसून येतात. यासाठी गर्भनिरोधक गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतल्या पाहिजेत. जेणेकरून होणारे धोके टाळता येतील.