‘पे अँड पार्क’ ठेकेदारांकडून अतिरिक्त ‘वसुली’, प्रशासनाची ‘डोळेझाक’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात ‘पे अँड पार्क’ ठेकेदारांचा मनमानी कारभार सुरू आहे. महापालिकेने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम आकारली जाते आहे. याचा नागरिकांमधून तीव्र संताप केला जात आहे. मात्र, महापालिका प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई न करता डोळेझाक केली जात आहे.

अहमदनगर शहरात काही रस्त्यांवर महानगरपालिकेने पार्किंगची सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र याठिकाणी कोणती सुविधा महानगरपालिकेचे ठेकेदार देत नाहीत. ठेकेदारांनी पे अँड पार्कच्या ठिकाणी नेमलेल्या कामगारांकडून अतिरिक्त वसुली नागरिकांकडून होताना दिसत आहे. महानगरपालिकेने ठरवून दिलेली रक्कम न येता सरसकट 20 ते 25 रुपयांची रक्कम नागरिकांकडून आकारली जात आहे. तसेच नागरिकांना दिलेल्या पावतीवर कोणताही नंबर नसल्याने ही पावती खरंच अधिकृत आहे का नाही असा प्रश्न निर्माण होतो. पे अँड पार्कच्या ठिकाणी अनेक अतिक्रमणे असतानाही त्याबाबत महानगरपालिका दुर्लक्ष करत आहे.

आनंदऋषीजी हॉस्पिटलसमोर महानगरपालिकेनेसुद्धा पे अँड पार्क सुरू केले आहे. मात्र या ठिकाणी महानगरपालिकेने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त रुपयांची आकारणी केली जात असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. याठिकाणी अनेक नागरिक बाहेरगावाहून येत असल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचं समोर आले आहे.

Loading...
You might also like