थेऊरफाटा लोणीकंद हायब्रीड प्रकल्पात ठेकेदाराची दिरंगाई, स्थानिकांची तीव्र नाराजी

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन – अष्टविनायक रस्ते विकास अंतर्गत थेऊरफाटा ते लोणीकंद या रस्त्याचा विकास होणार असून याला मंजुरी मिळून जवळपास दोन वर्षाचा कालावधी लोटला असून केवळ कोलवडीपासून केसनंदपर्यंतचे काम काही प्रमाणात पूर्ण केले असून आणखी मोठे काम शिल्लक आहे यावरुन ठेकेदाराचा काम ढकलपणा चालू असून यामुळे या मार्गावर प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते आहे नागरिकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

राज्य मार्ग क्र.58 वरील थेऊरफाटा थेऊर दरम्यान रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे अक्षरशः रस्त्यावरील डांबर गायप झाले असून मोठे खड्डे पडले आहेत.जड वाहनामुळे दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. स्थानिक आमदार तसेच खासदार हे सुध्दा याकडे दुर्लक्ष करतात की काय असा स्थानिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

युतीच्या कार्यकालात अष्टविनायक सुविधा प्रकल्प अंतर्गत हायब्रीड प्रकल्प मंजूर करण्यात आला त्यात 131 कोटी रुपये या मार्गासाठी खर्च मंजूर आहे हे काम दोन वर्षात पूर्ण करुन पुढील दहा वर्षे देखभाल करण्याची आहे परंतु दोन वर्षाचा कालावधी पूर्ण होण्यासाठी केवळ एक महिन्याचा कालावधी शिल्लक आहे परंतु सर्व कामाची टक्केवारी काढली तर केवळ 35 टक्के सुध्दा काम पूर्ण नाही. कामातील दिरंगाई बद्दल ठेकेदारास जबाबदार धरुन दंडात्मक कारवाई झाली पाहिजे कारण नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे.

You might also like