खुशखबर ! कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा, यापुढे मिळणार ‘हा’ मोठा अधिकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. नवीन नियमानुसार यामध्ये बदल करण्यात आले असून (Wage Code Draft Rule या नियमांमध्ये केलेल्या बदलानुसार कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यापुढे बोनस मिळणार आहे.

जर तुम्ही कोणत्या कंत्राटदाराच्या माध्यमातून किंवा कंपनीमध्ये कंत्राटी पद्दतीने काम करत असाल तर यापुढे तुम्हाला बोनसचा फायदा मिळणार आहे. या नवीन नियमांमध्ये प्रावधान करण्यात आले असून याद्वारे कंत्राटदाराला बोनससाठी नकार देता येणार नाही. श्रम मंत्रालयाने (Wage Code Draft Ruleया कायद्यामध्ये बदलासाठी हरकती मागवल्या असून जर तुमचे मासिक वेतन 21,000 पर्यंत असेल तर तुम्हाला बोनस मिळतो.

त्याचबरोबर कंपनीने महिना पूर्ण होण्याच्या आत कंत्राटदाराला पेमेंट करणे यामुळे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे आता यापुढे तुम्हाला या नवीन कायद्याचा मोठा फायदा होणार असून तुम्हाला कुणी नकार दिल्यास तुम्ही याची थेट तक्रार नोंदवू शकता.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like