Control Blood Sugar | ‘या’ पानांचा काढा घेतल्याने होईल शुगर कंट्रोल; जाणून घ्या याचे अनेक फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Control Blood Sugar | मधुमेह (Diabetes) आजार असणाऱ्या व्यक्तीनी कायम खाण्यावर लक्ष देणे गरजेचे असते. खरंतर मधुमेह हा आजार रक्तातील साखर अनियंत्रित होणे आणि इन्सुलिन हार्मोन (Insulin Hormone) स्वादुपिंडातून बाहेर न पडल्यामुळे होतो. महत्वाचे म्हणजे मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. समजा तुम्हालाही मधुमेहाचा आजार असेल तर काही घरगुती उपायांच्या सहाय्याने आपण साखर नियंत्रित (Control Blood Sugar) करु शकणार आहे. विशेषत: ऑलिव्हच्या पानापासून (Blood Sugar) तयार केलेला काढा. ऑलिव्ह पानांच्या (Olive Leaves) काढ्याचे दररोज सेवन केल्याने याचा फायदा दिसून येणार आहे.

 

ऑलिव्हच्या पानांचे फायदे जाणून घ्या (Know About Benefits Of Olive Leaves) –
ऑलिव्हच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स (Antioxidants) असतात. जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकतात. तसेच, रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी आणि ते निरोगी पातळीवर कायम ठेवण्यासाठीही खूप उपयुक्त आहे. संशोधनात असे आढळून आले आहे की, ऑलिव्हच्या पानांचा अर्क शरीरातील इन्सुलिन प्रतिरोध कमी करू शकतो, जो मधुमेहासाठी सगळ्यात मोठा जोखमीचा घटक आहे. अशी माहिती वेममेडेमध्ये दिली आहे. (Control Blood Sugar)

 

ऑलिव्हच्या पानांच्या (Olive Leaves) काढ्यामुळं रोग प्रतिकारशक्ती (Immunity) वाढते आणि हृदय, कर्करोग, पार्किन्सन, अल्झायमर (Heart, Cancer, Parkinson’s, Alzheimer’s) इत्यादी अनेक जुनाट आजारांमध्ये फायदा होतो. या शिवाय हे चांगले कोलेस्टेरॉल वाढवते आणि खराब कोलेस्टेरॉल (Bad Cholesterol) कमी करते. त्यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट आणि विरोधी दाहक गुणधर्म त्वचा निरोगी ठेवतात आणि शरीरातील कोणत्याही प्रकारची सूज कमी करतात.

काढा कसा बनवाल (How To Make Kadha) ?
ऑलिव्हची पाने पूर्णपणे स्वच्छ करून त्यांना 1 ग्लास पाण्यात उकळावीत. जेव्हा उकळून ते पाणी अर्धे होईल, तेव्हा त्यामध्ये काळी मिरी (Black Pepper) आणि मीठ (Salt) घालून तो प्या. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठाऐवजी मध (Honey) वापरू शकणारा आहात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Control Blood Sugar | drink olive leaves kadha to control blood sugar benefits of olive leaves kadha
 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Weight Loss Benefits | विना वर्कआऊट आणि डाएटशिवाय वजन होईल कमी, केवळ वापरून पहा ही एक गोष्ट

 

Jackfruit | फणस खाल्ल्यानंतर ‘या’ 5 गोष्टी चुकूनही खाऊ नका, होऊ शकतो मोठा तोटा

 

Benefits Of Black Turmeric | काळी हळद आरोग्य आणि सौंदर्य दोन्हीसाठी आहे अतिशय गुणकारी, होतात ‘हे’ आश्चर्यकारक 6 फायदे