Remdesivir Injection : पुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी कंट्रोल रूम, गरजूंनी Toll Free नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असताना कोरोना रुग्णांवर प्रभावी ठरणाऱ्या रेडमिसिव्हिर या इंजेक्शनचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यातच या इंजेक्शनचा काळा बाजार सुरु झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पुण्यात रेडमिसिव्हिर इंजेक्शनचा तुटवटा जावणत असताना काळा बाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान रेडमिसिव्हिरसाठी शहरात औषध दुकानांबाहेर रांगा लागल्याचे पहायला मिळत आहे. यावरुन सुरु झालेला गोंधळ थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून ‘कंट्रोल रुम’ची स्थापना केली आहे. गरजूंनी टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी धावपळ थांबवणार आहे.

पुण्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या पुरवठ्याचं योग्य नियोजन व्हावं यासाठी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी कंट्रोल रुम स्थापन करण्याचे आदेश काढले आहेत. या आदेशानुसार, ज्या रुग्णांना रेमडेसिव्हिर या इंजेक्शनची गरज असेल त्यांना 020-26123371 किंवा 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. रेडमिसिव्हिर संदर्भात स्थापन करण्यात आलेली ही कंट्रोल रुम 31 मे पर्यंत कार्यरत असणार आहे.