वादग्रस्त सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझेंच्या अडचणीत वाढ; न्यायालयानं अंतरिम जामिन अर्ज फेटाळला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पोलिस अधिकारी सचिन वाझेंचा अंतरिम अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यांच्या अटक पुर्व जामिनावर १९ मार्च रोजी होणार सुनावणी आहे. सचिन वाझे यांना अटकेपासून संरक्षण नसल्याने त्यांचा गुन्ह्यात सहभाग आढळल्यास त्यांच्यावर अटकेची कारवाई होऊ शकते.

वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी अटकेच्या भीतीने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. मनसुख हिरेन यांची पत्नी विमला हिरेन यांनी दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) दिलेल्या तक्रारीत सचिन वाझे यांच्याविरोधात आरोप केल्यानंतर शुक्रवारी वाझे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. सत्र न्यायालयात हा अर्ज करण्यात आला आहे. त्याची पुढील सुनावणी 19 मार्चला होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्या सुनावणीच्या आधी न्यायालय एटीएसकडून याप्रकरणाची माहिती घेण्याची शक्यता आहे.

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी सचिन वाझे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. पण त्यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. वाझेंना अटक करण्याची मागणी भाजपने केली आहे