‘कोरोना’ लसीसंदर्भात इमामांचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले…

पर्थ : वृत्तसंस्था –   मुसलमानांनी कोरोना लस टोचू नये, कारण हे हराम आहे, असे वादग्रस्त वक्तव्य एका इमामांनी केले आहे. सुफयान खलीफा नावाच्या इमामांनी एक व्हिडीओ पोस्ट करून आपल्या फॉलोअर्सना लस न टोचण्याचे आवाहन केले आहे. तसेच ज्या मुस्लीम संघटना लसीचे समर्थन करत आहेत, त्यांच्यावरही त्यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या पर्थमध्ये राहणाऱ्या सुफयान खलीफा या इमामांनी आपल्या सोशल मीडिया फोलोअर्सना आवाहन केले आहे की, त्यांनी फॅसिझमचा विरोध करावा आणि लस टोचू नये. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, इतरही काही धार्मिक नेत्यांनी ऑक्सफर्डच्या लशीला विरोध केला आहे. कारण ही लस एक अँबॉर्टेड बेबीच्या लसपासून तयार करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियन सरकारने नुकताच ऑक्सफर्ड लशीच्या पुरवठ्यासाठी करार केला आहे.

सुफयान खालीफ नावाच्या ईमामांनी म्हटले आहे, अशा मुस्लीम संस्थांची लाज वाटते, ज्या लशीचा वापर योग्य असल्याचे ठरवत आहे. इमामांनी म्हटले की, कॅथॉलिक ख्रिश्चन देखील या लशीला विरोध करत आहेत, कारण हे हराम आहे. बेकायदेशीर आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियातील एका ख्रिश्चन धर्मगुरुंनीही ऑक्सफर्डच्या कोरोना लशीला विरोध केला होता. मात्र, इतर धार्मिक नेत्यांनी लशीच्या वापराचे समर्थन केले आहे. ऑस्ट्रेलियन नॅशनल इमाम काऊंसिलचे प्रवक्ते बिलाल रऊफ म्हणाले, इस्लामचा सर्वात मोठा सिद्धांत वाचवणे हा आहे.