खासदार रक्षा खडसेंचा भाजपाच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख ; अनिल देशमुख यांच्याकडून गंभीर दखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रावेर मतदारसंघातुन निवडून आलेल्या भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांचा भाजपच्या अधिकृत वेबसाईवर एक आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला आहे.  हा भाजपाच्या अधिकृत वेबासाईटवर एक मोठी चूक झाली आहे. या प्रकरणावरून महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गंभीर दखल घेत प्रातिक्रिया व्यक्त केली आहे. परंतु हा प्रत्यक्षात हा गोंधळ गुगल भाषांतराचा असल्याचे समोर आले आहे.

यावर  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे कि, भाजपाच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसे यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपाने संबंधित दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, नाहीतर महाराष्ट्र सायबर पुढील कारवाई करेल, असा इशारा देशमुख यांनी दिला आहे.

हे प्रकरण प्रत्यक्षात खातरजमा केली असता हा भाषांतराचा गोंधळ असल्याचे दिसत आहे. हिंदीचा पर्याय निवडल्यानंतर खासदारांच्या यादीत रक्षा खडसे यांचा उल्लेख योग्यच असल्याचे दिसत आहे. श्रीमती रक्षा खडसे, रावेर (महाराष्ट्र) असे कॅप्शन रक्षा यांच्या फोटोला देण्यात आले आहे. तर Raver या इंग्रजी शब्दाचे गुगल ट्रान्स्लेटमध्ये जाऊन हिंदीत भाषांतर केले असता होमोसेक्सुअल असा अर्थ सांगितला जात आहे. प्रत्यक्ष  या भाषांतरातूनच हा सर्व गोंधळ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.