वाधवान प्रकरणातील ‘वादग्रस्त’ गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता पुन्हा सेवेत रुजू

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  लॉकडाउनमध्ये वाधवान बंधूंसह 23 जणांना महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगीचे पत्र दिल्यामुळे सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. याप्रकरणी वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य आयुक्त मनोज सौनिक यांनी काही दिवसांपूर्वीच चौकशी अहवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांना सादर केला होता.

मानवतेच्या दृष्टिकोनातून वाधवान बंधूंना पत्र दिल्याची कबुली गुप्ता यांनी चौकशी समितीसमोर दिली होती. या प्रकरणी गुप्ता यांना समज देण्यात आली असून भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी ताकीद देण्यात आली. लॉकडाऊनचे नियम मोडत गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता यांनी 8 एप्रिलला कपिल वाधवान आणि त्यांच्या कुटुंबाला महाबळेश्वपर्यंत प्रवास करण्यासाठी शिफारसपत्र दिले होते. या प्रकरणी राज्य सरकारने अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवत त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. मात्र आता अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या उत्तरावर लगेच समाधानी होत त्यांनी पुन्हा कामावर रुजू होण्यास परवानगी कपील आणि धीरज वाधवान हे हाऊसिंग फायनान्स लि.चे प्रमोटर्स आणि येस बँक घोटाळ्याचे आरोपी आहेत.