पोरगी पळवून आणू, तुझ्या काय बापाची ठेव आहे का?

पुणे : वृत्तसंस्था

दहीहंडी उत्सवादरम्यान भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी महिलांविषयी वादग्रस्त विधान केले. या विधानाचा अजित पवार यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला. सरकार म्हणतंय बेटी बचाव आणि बेटी पढाव आणि यांचा एक निर्लज्ज आमदार म्हणतोय पोरगी पळवून आणू. तुझ्या काय बापाची ठेव आहे का? कशाची मस्ती आली? आणि हे भाजपचे प्रवक्ते म्हणून मिरवतात असे म्हणत त्यांना त्यांची जागा दाखवायची वेळ आली असल्याचे अजीत पवार यांनी सांगितले.
[amazon_link asins=’B07417987C,B076H74F8N’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fe2bc850-b29a-11e8-ab20-374802cb2684′]

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्यावतीने आयोजित बाबुरावजी घोलप पुरस्कार प्रदान समारंभात अजित पवारांनी राम कदम यांच्यावर जोरदार टीका केली.

ते म्हणाले की पक्षाचा एक आमदार महिलांबाबत असे बोलतो. मात्र, पक्षाचे प्रमुख लोक काही बोलू शकत नाहीत हे घातक आहे. यावर माफी मागणे तर दुरच, पण खेद काय व्यक्त करतात, दिलगिरी काय व्यक्त करतात. मात्र, त्यांना पाठिशी घालण्यात येत आहे. त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायलाच हवी.

महत्वाच्या बातम्या

‘अॅट्रोसिटी’तील बदलाची सुप्रीम कोर्ट पडताळणी करणार 

मुंबई : राम कदमांचा आणखी एक प्रताप, जीवंत अभिनेत्रीला वाहिली श्रद्धांजली 

उपोषणाचा तेरावा दिवस: हार्दिकची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल