शेतकऱ्यांच्या मुलांची ‘लावारिस’ अशी संभावना करणाऱ्या या पाळीव वाघांचा बोलविता धनी कोण ?

राष्ट्रवादीचा ट्विटरवरून हल्लाबोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी वादग्रस्त ट्विट करत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा अपमान केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीने यामागे बोलवता धनी नक्की कोण आहे? असा सवाल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्यावर निशाना साधला आहे. त्यासंदर्भातील एक कार्टूनही त्यांनी आपल्या ट्विटरवरून शेअर केले आहे.

या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या हातात एक वाघाचे कातडे पांघरलेला कुत्रा दाखविण्यात आला असून या पाळीव वाघांचा बोलवता धनी कोण? असा प्रश्न विचारला आहे. यातून राष्ट्रवादी कॉंग्रेसने अवधूत वाघ यांच्या वादग्रस्त विधानावर सडकून टिका केली आहे. त्याबाबतच राष्ट्रवादीने भाजप, देवेंद्र फडणवीस व अवधूत वाघ यांना लक्ष करत आपल्या ट्विटर हॅडलवरू हल्लाबोल केला आहे.

अवधूत वाघ यांचं बेताल वक्तव्य
भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी वादग्रस्त ट्विट करत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा अपमान केला. अवधूत वाघ यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा लावारिस असा उल्लेख करत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात असं अवधूत वाघ यांनी म्हटलं आहे. चौकीदार अवधूत वाघ नावाने त्यांचं ट्विटर अकाऊंट असून त्यावर हे ट्विट करण्यात आलं आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या बाबत असे वक्तव्य केल्याने अवधूत वाघ यांच्यावर सर्व स्थरातून टीका होती असून संताप व्यक्त केला जात आहे.

Avdhut-Wagh

भाजपा प्रवक्ते अवधूत वाघ यांचं वादग्रस्त ट्विट
मराठा क्रांती वॉरियर या ट्विटर हँडलवरुन शेतकरी पुत्र आणि सर्वसामान्यांचा आवाज असणाऱ्या पत्रकारांना ट्रोल करू नका असा इशारा देण्यात आला होता. यावर उत्तर देताना अवधूत वाघ यांनी आक्षेपार्ह भाषा वापरत पातळी सोडली. ‘आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात बाबा’, असं उत्तर अवधूत वाघ यांनी दिलं. त्यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like