तिने केले भर स्टेजवर हिरोला KISS आणि….. पुण्यातील ‘पॅसिफिक’ मॉलमध्ये FULL ON राडा 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोणताही फॅन आपल्या आवडत्या कलाकारासाठी CRAZY असतो.  त्यात हल्लीची पिढी म्हणजे काय करेल हे विचारू नका. पुण्यात एक असाच किस्सा घडला एका मॉलमध्ये एका सिनेमाचं प्रमोशन सुरू असताना एक तरुणीने अचानक स्टेजवर येऊन हिरोला किस केले. त्यामुळे  चित्रपटाच्या प्रमोशमध्येच गोंधळ उडाला.

‘फाईट’ या मराठी चित्रपटाचं पॅसिफिक मॉलमध्ये प्रमोशन सुरू असताना एक तरूणी अचनाक थेट स्टेजवर आली. काही कळण्याच्या आतच तिने फाईट चित्रपटाचा नायक असलेल्या जीतला मिठी मारली आणि सर्वांसमक्ष प्रेमाने चुंबनही घेतलं. ही मुलगी आपल्या प्रियकरासोबत त्या मॉलमध्ये आली होती.

हा प्रकार घडल्यानंतर तो प्रियकरही तिच्या मागोमाग स्टेजवर आला आणि तिला त्याने खाली घेतलं. सोबत जाबही विचारला. त्या दोघांमध्ये वाद झाला. आणि काही कळायच्या आत, तिने आपल्या प्रियकराच्या कानफटात मारली. त्यानंतर रागाने ते तिथून निघून गेले. याप्रसंगी चित्रपटाची संपूर्ण टीम स्टेजवर उपस्थित होती.

फाइट चित्रपटाबद्दल – फाइट हा मराठीतील अॅक्शनपॅक्ड सिनेमा  २० डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
फ्युचर एक्स प्रॉडक्शनच्या ललित ओसवाल यांनी फाइट या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाची संकल्पना आणि दिग्दर्शन पुण्याचे नवोदित तरुण अँक्शन दिग्दर्शक जिमी मोरे यांची असून त्यांचे या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकीय पदार्पण होत आहे.

महाराष्ट्राच्या मातीतलं कथानक आणि थरारक अॅक्शन असलेल्या फाईट या चित्रपटात माधव अभ्यंकर, सुरेश विश्वकर्मा, पूर्वा शिंदे यांच्यासह जीत मोरे, सायली जोशी, निशिगंधा कुंटे,  अनुप इंगळे, मंगेश नंदे, राहुल फलटणकर, करम भट हे नव्या दमाचे कलाकार आहेत. जीत मोरे या नवोदित तरुणाची या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका असून एक अॅक्शन पॅक हिरो या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्या भेटीस येणार आहे. फिरोझ खान यांनी फाईट मास्टर म्हणून काम पाहिले आहे.