काँग्रेस सेवादलाच्या पत्रिकेवरुन आता पुन्हा ‘वाद’, सावरकर आणि गोडसे यांच्या संबंधावर ‘टिप्पणी’

भोपाळ : वृत्त संस्था – माफी मागण्यास आपण राहुल सावरकर नाही, या राहुल गांधी यांच्या टिपण्णीवरील धुराळा खाली बसत असतानाच मध्य प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या पत्रिकेतील लेखामुळे हा वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश भाजपाने या लेखाचा निषेध केला असून त्यात आता शिवसेनेला ओढल्याने हा वाद वाढण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या पत्रिकेत सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्या संबंधावर एक लेख लिहिण्यात आला आहे. या पत्रिकेच्या मुखपुष्ठावर सावरकर आणि गोडसे यांच्या फोटोंबरोबरच वीर सावरकार कितने वीर? असे शिर्षक देण्यात आले आहे. यावरुन आता वाद रंगू लागला आहे.

भाजपचे रामेश्वर शर्मा यांनी काँग्रेसच्या या पत्रिकेवर टिका करताना सांगितले की, शंभर काँग्रेसी नेता जन्मले तरी ते सावरकरांची जागा घेऊ शकत नाही. त्यावर पत्रिकेचे मुख्य संपादक लालजी देसाई यांनी या लेखात तथ्याला धरुन काही गोष्टी समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. आजवर लोकांना चुकीची माहिती देऊन फसविण्याचा प्रयत्न केला आहे. हा लेख वाचणारा आपले मत निश्चित करेल.

सावरकर यांना भारतरत्न द्यावे अशी मागणी शिवसेनेने केली आहे. हे लक्षात आणून देत भाजपाचे नरोत्तम मित्रा यांनी यावरुन शिवसेनेला या वादात ओढले आहे. त्यांनी सांगितले की, काँग्रेसचे हे म्हणणे शिवसेनेला मान्य आहे का, हे त्यांनी जाहीर करावे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/