तुमच्या बँक खात्याला ‘या’ पध्दतीनं बनवा Jandhan Account, मिळेल लाखोंचा फायदा; जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्त संस्था – जनधन योजना अतिशय कामाची आहे. जर तुम्ही योजनेंतर्गत आपले खाते उघडले नसेल तर तुम्ही तुमचे सामन्य बँक खातेसुद्धा जनधनमध्ये बदलू शकता. असे केल्याने तुम्हाला लाखो रुपयांचा फायदा मिळेल. येथे आम्ही तुम्हाला जनधन खात्याचे फायदे आणि इतर माहिती देणार आहोत. तसेच तुमचे बचत खाते जनधनमध्ये कसे बदलायचे ते सुद्धा सांगणार आहोत.
असे उघडा जनधन खाते
जनधन खाते उघडण्याची प्रक्रिया एकदम सोपी आहे. तुम्ही कोणत्याही सरकारी किंवा प्रायव्हेट बँकेत जाऊन आपले जनधन खाते उघडू शकता. प्रथम प्रधानमंत्री जनधन योजनेच्या अधिकृत वेबसाइट किंवा सरकारी बँकेतून फॉर्म मिळवा. फॉर्म भरल्यानंतर काही आवश्यक कागदपत्र जोडा. यामध्ये तुम्ही पासपोर्ट / ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड / जॉब कार्ड, जे नरेगाद्वारे जारी केलेले असते, इत्यादी लागू शकते. योग्य व्हेरिफिकेशननंतर तुमचे खाते उघडले जाईल.
बचत खात्याचे असे करा जनधन खाते
कोणत्याही जुन्या बचत खात्याला जनधन खाते करणे खुप सोपे आहे. सर्वप्रथम तुमच्या बँकेच्या शाखेत जा. तिथे एक फॉर्म घेऊन भरा. नंतर आपल्या खात्यासाठी रुपे कार्डसाठी अर्ज करा. तो भरल्यानंतर बँकेत जमा करा. यानंतर तुमचे खाते जनधन खात्यात बदलले जाईल.
या सुविधा मिळतील
* झीरो बॅलन्स सुविधा मिळते.
* ओव्हरड्राफ्ट सुविधेसह रुपे डेबिट कार्ड सुद्धा मिळते.
* 2 लाख रुपयांचा अपघात विमा सुद्धा मिळेल.
* चेकबुक मिळू शकते.
* लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला 30000 रुपयांची आर्थिक मदत.