Conviction In Acb Trap Case | पुण्यातील ट्रक चालकाकडून 4 हजाराची लाच घेणार्‍या मोटर वाहन निरीक्षकासह सहाय्यक रोखपालास न्यायालयाने सुनावली शिक्षा

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Conviction In Acb Trap Case | पुण्यातून (Pune) माल घेऊन जाणार्‍या ट्रकला नंदुरबार जिल्हयातील (District Nandurbar) अक्कलकुवा (Akkalkuva) तालुक्यातील गव्हाली चेक पोस्टवर (गुजरात बॉर्डर) Gujarat Border Checkpost अडवून ट्रक चालकाकडून 4 हजाराची लाच (Bribe Case) एन्ट्रीच्या स्वरूपात घेणार्‍या मोटर वाहन निरीक्षक (Motor Vehicle Inspector) आणि सहाय्यक रोखपालास नंदुरबार जिल्हयातील शहादा (Shahada Court) येथील जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी शिक्षा सुनावली आहे. (Conviction In Acb Trap Case)

तत्कालीन मोटर वाहन निरीक्षक सूर्यभान रेवजी झोडगे (Suryabhan Revji Zodge) आणि सहाय्यक रोखपाल वेलजी नहाडिया मावची Velji Nahadia Mawchi(दोन्ही नेमणुक – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नंदुरबार – Office of Deputy Regional Transport Officer, Nandurbar) अशी शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 24 फेब्रुवारी 2012 रोजी तक्रारदार हे त्यांच्या ट्रकमध्ये माल भरून गुजरातकडे जात होते. तत्कालीन मोटर वाहन निरीक्षक सूर्यभान रेवजी झोडगे आणि सहाय्यक रोखपाल वेलजी नहाडिया मावची यांनी तक्रारदाराचा ट्रक गव्हाली चेक पोस्टवर अडविला. त्यांच्याकडून 4 हजार रूपयाची लाच एन्टीच्या स्वरूपात घेतली होती. त्यावेळी अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने (Nandurbar ACB) त्यांना रंगेहाथ पकडले होते. (Conviction In Acb Trap Case)

अक्कलकुवा पोलिस स्टेशनमध्ये (Akkalkuva Police Station) दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नमुद गुन्हयाचा तपास करून अ‍ॅन्टी करप्शनच्या (Nashik ACB) अधिकार्‍यांनी दोषारोपपत्र न्यायालयात
(Chargesheet) दाखल केले होते.
दरम्यान, शहादा येथील जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी.एस. दातीर (Judge S C Datir)
यांनी दोघांना दोषी ठरवत भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7 अन्वये प्रत्येकी 1 वर्ष कैदेची शिक्षा व
5 हजार रूपये दंड तसेच कलम 13 (ड) अन्वये प्रत्येकी 2 वर्ष कैदेची शिक्षा व 5 हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

खटल्यामध्ये शहादा न्यायालयातील सहाय्यक सरकारी वकील तथा सहाय्यक सरकारी अभियोक्ता स्वर्णसिंह गिरासे
(Adv Swarnasinh Girase) यांनी काम पाहिले. कोर्ट समन्वय अधिकारी / पैरवी अधिकारी म्हणून नंदुरबार
येथील अ‍ॅन्टी करप्शनविभागातील पोलिस उप अधीक्षक राकेश आ. चौधरी (DySP Rakesh Choudhary),
पोलिस निरीक्षक समाधान म. वाघ (PI Samadhan Wagh) आणि पोलिस हवालदार अमोल मराठे
(Police Amol Marathe) यांनी काम पाहिले. नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर
(SP Sharmistha Gharge-Walawalkar) आणि पोलिस उप अधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar)
यांनी कोर्ट समन्वय अधिकारी / पैरवी अधिकार्‍यांना मार्गदर्शन केले.

Advt.

Web Title :  Conviction In Acb Trap Case | The court sentenced the motor vehicle inspector and the assistant cashier who accepted a bribe of 4 thousand from a truck driver of Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Chief Sharad Pawar | गुन्हेगारांना त्यांची जागा दाखवा, नांदेड खून प्रकरणावर शरद पवारांची संतप्त प्रतिक्रिया (व्हिडिओ)

Devendra Fadnavis | ‘दुसऱ्या धर्मातील व्यक्तीसोबत लग्न करण्यावर आक्षेप नसावा, पण…’, देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान (व्हिडिओ)

Ajit Pawar | ‘मिठाचा खडा कुणी टाकण्याचा…’, मविआतील जागावाटपावर अजित पवार स्पष्टच बोलले