थोरात खून प्रकरणातील आरोपींकडून आणखी एका खुनाची कबुली

दौंड – अब्बास शेख

दौंड तालुक्याच्या खुटबाव येथील रहिवासी असणाऱ्या हनुमंत निवृत्ती थोरात यांचा अपहरण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना यवत पोलिसांनी उघडकीस आणल्यानंतर आता त्याच आरोपींकडून तीन वर्षांपूर्वी एका महिलेचा खून केल्याची घटना उघडकीस आणली आहे. याप्रकरणी यवत पोलिसांनी घेतलेल्या विशेष परिश्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

अत्याचार झालेल्या ‘त्या’ मुलीच्या गुन्ह्याचा तपास महिला अधिकाऱ्याकडे

मिळालेल्या माहितीनुसार, हनुमंत थोरात यांच्या खून प्रकरणातील आरोपी सुरज उर्फ पप्पू सुभाष ओहोळ रा.वाखारीं ता.दौंड. रावसाहेब साहेबराव फुलमाळी रा.श्रीगोंदा जि अहमदनगर यांना यवतचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर, सहा.पोलीस निरीक्षक विनायक देवकर, सहा.पो.फौजदार रमाकांत गवळी, पो.ना.महेश बनकर, संदीप कदम, गणेश पोटे या पोलीस अधिकाऱ्यांनी विविध माध्यमातून माहिती गोळा करीत आरोपींनी अजून कुठे काही गुन्हे केले आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9b4c844b-bcac-11e8-ab27-a5f0d6c4c244′]

याबाबत कसून चौकशी केली होती यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना आरोपींचा दाट संशय आला होता. त्यामुळे अधिक माहितीसाठी आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच वरील आरोपींनी आपण २०१५ साली कर्जत पोलीस स्टेशन जिल्हा अहमदनगरच्या हद्दीमध्ये एका ३५ वर्षीय महिलेचा अनैतिक संबंधासाठी गळा दाबून खून केला असल्याचे व मृतदेह करपडी गाव ता.कर्जत येथे टाकून देऊन पुरावा नाहीसा केला होता. यावेळी या खून प्रकरणात आरोपींनी सोपान पाटील आव्हाड रा.पेडगाव ता.कर्जत अहमदनगर व अशोक फुलमाळी रा.भातकूडगाव ता.शेवगाव जि. अहमदनगर यांच्या मदतीने खून केल्याचे कबुली दिली. यवत पोलिसांनी याबाबत कर्जत पोलीस स्टेशनला माहिती दिली असून पुढील कारवाई कर्जत पोलीस करत आहेत.

[amazon_link asins=’B01DEWVZ2C,B01J82IYLW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a8267708-bcac-11e8-9134-97d9af807e41′]

Loading...
You might also like