‘या’ कारणांमुळे खाद्यतेलाच्या किंमती वाढणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लवकरच तुम्ही वापरत असलेले खाद्य तेल महागण्याची शक्यता आहे. सरकार आता सर्वांसाठी सर्वात महत्वाचे असलेल्या खाद्य तेलावर आयात शुल्क वाढवण्याचा विचार करत आहे. सरकार खाद्य तेलाच्या आयातीवर लगाम लावण्यासाठी एक ‘राष्ट्रीय मिशन फंड’ करण्याच्या तयारीत आहे. याची फंडिग आयातीवर शुक्ल लावून करण्यात येईल. असे अनुमान बांधण्यात येत आहे की, सरकार कच्चे तेल आणि रिफाईंड खाद्य तेल यावर २ – १० टक्के शुल्क लावू शकते. त्यामुळे कच्चा तेलाबरोबर खाद्य तेलाच्या किंमती देखील वाढणार आहे.

राष्ट्रीय अभियानात ७० हजार कोटी रुपये देणार

यंदाच्या वर्षी तेलाच्या आयातीवर ७० हजार कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च येत होता. खाद्य पदार्थाच्या आयात शुल्कावर जी कमाई होईल तेथे एक राष्ट्रीय अभियानात लावण्यात येईल. याने शेतकरी आणि स्थानिक उद्योगांना मदत मिळण्याची शक्यता आहे. तसेच आर्थिक तोटा देखील कमी होईल. या आधी या अभियानात १० हजार कोटी रुपयांचे फंड देण्याचा विचार करण्यात येईल.

एवढी आहे कस्टम ड्युटी

इंडोनेशिया आणि इतर आसियान देशातून येणारे कच्च्या पाम तेलावर ४० टक्के कस्टम ड्युटी लावण्यात येते. तर मलेशियातून येणाऱ्या रिफाइंड पाम तेलावर ४५ टक्के ड्युटी लावण्यात येते. जर हेच तेल इंडोनेशिया किंवा इतर आसियान देशातून खरेदी करण्यात येणाऱ्या तेलावर ५० टक्के शुल्क आहे. एकूण मिळून कच्च्या व रिफाइंड पाम तेलावरील आयात शुल्क ४४ ते ५४ टक्क्यांच्या दरम्यान असते.

२.५ कोटी टन तेलाची भारताला आवश्यक्ता

देशात खाद्य तेलाची वर्षाला असलेली आवश्यकता २.५ कोटी टन आहे, ज्यातील १.५ कोटी टन आयात करण्यात येते. यामुळे भारत जगातील खाद्यतेल आयात करणाऱ्यामधील एक देश आहे. निर्मला सितारामन यांनी शेतकऱ्यांना आवाहन केली की देशातील खाद्य तेलाचे उत्पादन वाढवण्यात मदत करा.

Loading...
You might also like