Coolie No. 1 : ‘कुली नंबर 1’ मधील पहिलं गाणं रिलीज ! वरुणनं साराला ‘भाभी’ म्हणून केलं प्रेझेंट

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार वरुण धवन (Varun Dhawan) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) सध्या त्यांचा आगामी सिनेमा कुली नंबर 1 (Coolie No. 1) मुळं चर्चेत आहेत. हा सिनेमा अ‍ॅमेझॉन प्राईम (Amazon Prime) वर ख्रिसमस डे ला म्हणजेच 25 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. शनिवारी (दि. 28 नोव्हेंबर) सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. आता या सिनेमातील गाणं तेरी भाभी (Teri Bhabhi – Coolie No.1, Varun Dhawan, Sara Ali Khan) रिलीज झालं आहे. गाण्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद आहे.

तेरी भाभी गाण्यात वरुण आणि सारा यांचा जबरदस्त डान्स दिसत आहे. गाण्यातील दोघांची केमिस्ट्रीही चाहत्यांना खूप आवडली आहे. सध्या या गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

गाण्याबद्दल बोलायचं झालं तर जावेद मोहसिन, देव नेगी, नेहा कक्कर असं तिघांनी मिळून हे गाणं गायलं आहे. याशिवाय दानेश साबरी यानं या गाण्याची निर्मिती केली आहे.

कुली नंबर 1 सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर बॉलिवूड स्टार करिश्मा कपूर (Karisma Kapoor) आणि गोविंदा (Govinda) यांच्या 1995 साली आलेल्या कुली नंबर 1 या सिनेमाचा हा रिमेक आहे. डेविड धवन नं या सिनेमाचं डायरेक्शन केलं आहे. रिमेकमध्ये सारा आणि वरुण सोबतच परेश रावल, जावेद जाफरी, जॉनी लिवर, राजपाल यादव सहित इतर कलाकार दिसणार आहेत. वाशु भगनानी, जॅकी भगनानी आणि दीपशिखा देशमुख यांनी याची निर्मिती केली आहे.

You might also like