रेल्वेस्टेशनवरील मोफत वायफायमुळे त्याचे आयुष्य बदलले

एर्नाकुलम : वृत्तसंस्था
आज प्रत्येक तरुण विद्यार्थी कुठे मोफत वायफाय मिळेल याच्या शोधात असतो आणि ते मिळाले की, मनोरंजनपर व्हिडीओ, गाणी, चित्रपट तर काहीजण पॉर्न साईट देखील बघत बसतात. मात्र या मोफत सुविधेचा जास्तीत जास्त चांगला वायपर करून घेतल्यास किती मोठा फरक पडतो, हे सांगणारे केरळ मधील हे उदाहरण आहे.
केरळमधील एर्नाकुलम जंक्शनवर हमालांचे काम करणाऱ्या के श्रीनाथने ‘राज्य लोकसेवा आयोग’ म्हणजेच ‘केपीएससी’ची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. श्रीनाथच्या यशाचे कौतुक प्रचंड आहेच परंतु त्याने मोकळ्या वेळात रेल्वे स्थानकावरील मोफत वाय फाय वापरून हे यश मिळविले आहे.

केरळच्या एर्नाकुलम जंक्शनवर के.श्रीनाथ हा तरुण हमालीचे काम करतो. स्टेशनवरील मोफत वायफायमुले त्याने इंटरनेटवरुन मोफत प्रश्नपत्रिका सोडवून, यापरीक्षेचे व्हिडीओ पाहून केपीएससी परीक्षा दिली. आणि त्यात तो उत्तीर्ण देखील झाला.

के.श्रीनाथच्या मते,” गुगल आणि वायफायमुळे माझे आयुष्य बदलले आहे. मी इंटरनेटवरुन मोफत प्रश्नपत्रिका डाऊनलोड केल्या आणि तयारीसाठी अनेक व्हिडीओ देखील पाहिले. या साऱ्यासाठी स्टेशनवरील मोफत इंटरनेटचा मला खूप फायदा झाला,”असे श्रीनाथने सांगितले.

मोफत इंटरनेट मिळाले की, त्याचा कसाही वापर केला जातो. मात्र एर्नाकुलममधील के.श्रीनाथचा आदर्श देशातील प्रत्येक तरुणांनी घेतला, यामुळे नक्कीच सकारात्मक फरक पडेल.