सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणार्‍या डॉक्टरांची चौकशी करा, भाजपाच्या ‘या’ खासदाराची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुशांतच्या मृतदेहावर करण्यात आलेल्या शवविच्छेदनासंदर्भात सुब्रमण्यम स्वामींनी शंका उपस्थित केली आहे. स्वामी यांनी सुशांतचे शवविच्छेदन झालेल्या कूपर रुग्णालयातील डॉक्टरांचीही सीबीआयच्या अधिकार्‍यांनी चौकशी करावी अशी मागणी ट्विटरवरुन केली आहे.

सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणार्‍या डॉ. सी. आर. कूपर महापालिका रुग्णालयातील पाच डॉक्टरांची सीबीआयने चौकशी केल्यास बरीच माहिती मिळेल. सुशांतचा मृतदेह रुग्णालयामध्ये नेणार्‍या रुग्णवाहिकेमधील कर्मचार्‍यांच्या माहितीनुसार पाय मुरगळलेल्या अवस्थेत होते. मृतदेहाचा घोट्याखालील पायाचा भाग हा मुरगळल्याप्रमाणे होता, असे स्वामी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. हे ट्वीट काही तासांमध्ये 20 हजारहून अधिक जणांनी ते रिट्विट केले आहे. स्वामी यांनी अशाप्रकारे यापूर्वीही सुशांतच्या आत्महत्येसंदर्भातील ट्विट केले आहेत.

यामध्ये अगदी मला असे का वाटतय की सुशांतची हत्याच झाली आहे. बॉलिवूडचे तीन खान म्हणजेच सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान हे सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या घटनेबाबत शांत का? असे अनेक ट्विट त्यांनी मागील काही आठवड्यांमध्ये केले आहेत. सुशांत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी सुब्रमण्यम स्वामी प्रयत्न करत होते. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र देखील लिहिले होते. अखेर पाच ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने सीबीआय चौकशीसाठी मान्यता दिली. केंद्र सरकारने सुशांत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी सीबीआयकडे सोपवली आहे.