PMC बँकेनंतर आणखी एका बँकेत कोट्यावधीचा घोटाळा, 1 लाख ग्राहक काढू शकणार नाहीत पैसे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पंजाब-महाराष्ट्र सहकारी (PMC) बँकेनंतर आता पुणे मुख्यालय असणाऱ्या ‘शिवाजीराव भोसले सहकारी बँके’चा घोटाळा उघडकीस आला आहे. आर्थिक अनियमिततेमुळे शिवाजीराव भोसले बँक अडचणीत आली आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेकडून शिवाजीराव भोसले बँकेवर आर्थिक निर्बंध घालण्यात आले आहेत. आरबीआयच्या आदेशानुसार, शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून, या बँकेवर प्रशासक नेमण्यात आला आहे. बँकेवरील या कारवाईमुळे बँकेचे सुमारे एक लाख खातेदार सध्या बँकेतून पैसे काढू शकत नाहीत.

बँकेचे प्रमोटर राष्ट्रवादीचे नेते
हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर बँकेचे संचालक मंडळाला कामावरून काढून प्रशासक नेमण्यात आला आहे. बँकेच्या सुमारे एक लाख ग्राहकांना या कारवाईचा फटका बसला आहे. विशेष म्हणजे या बँकेचे प्रमोटर हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य अनिल शिवाजीराव भोसले आहेत.

बँकेचे सध्याचे संचालक मंडळ हटवले
सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की एप्रिल 2019 मध्ये आरबीआयने विशेष तपासणी केली होती. या तपासणीत शिवाजीराव भोसले सहकारी बँक लिमिटेडच्या कामकाजात प्रचंड अनियमितता आढळली. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे विद्यमान संचालक मंडळ हटविण्यात आले आहे. या संचालक मंडळाच्या जागी उपजिल्हा निबंधक नारायण आघाव यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सहकारी संस्थांचे कुलसचिव आणि सहकार आयुक्त यांनी आरबीआयशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

बोगस वितरणाचा परिणाम
शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवरील आर्थिक निर्बंधांमुळे ग्राहक हवालदिल झाले आहेत. बँकेचे सुमारे एक लाख खातेदार सध्या बँकेतून पैसे काढण्यास असमर्थ आहेत.

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत सुमारे 430 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. सुमारे 310 कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. अनुत्पादित कर्जाची रक्कम सुमारे 294 कोटी रुपये आहे.
Visit : policenama.com
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी