‘तो’ लाचखोर कर्मचारी ‘थेट’ बडतर्फ ; पोलीस अधिक्षकांची ‘धडक’ कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अँटी करप्शनच्या ट्रॅपची चाहूल लागताच सुसाट पसार झालेल्या पौड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला शासकिय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. लाच स्विकारल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची गंभीर दखल घेत पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांनी त्याला सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश दिले आहेत.

पोलीस नाईक योगेश पुरुषोत्तम सवाने असे बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याला गुन्हा दाखल झाल्यानंतर निवलंबित करण्यात आले होते.

लाच स्विकारल्यानंतर सुसाट

सवाणे याने तक्रारदाराचा वाहन चालविण्याचा परवाना घेतला होता. त्यानंतर तो परत देण्यासाठी त्याच्याकडे २ हजार ५०० रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती २२०० रुपये स्विकारण्यास तो तयार झाला. त्यानंतर अँटी करप्शनच्या पथकाने ससून रुग्णालय परिसरात सापळा रचला होता. मात्र तक्रारदाराकडून लाच स्विकारताना त्याला अँटी करप्शनच्या ट्रॅपची चाहूल लागल्याने तो लाचेच्या रकमेसह त्याच्या कारसह पसार झाला होता. त्याच्याविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधिक्षकांनी घेतली गंभीर दखल

पोलीस नाईक सवाने याने केलेले कृत्य पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारे असून त्याने केलेल्या या कृत्याबद्दल त्याला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर प्रकरणाची गंभीरधकल घेत पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांनी पोलीस नाईक योगेश पुरुषोत्तम सवाने याला भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३११ (२) (बी) नुसार तात्कळ सेवेतून बडतर्फ केले आहे. त्यानंतर पोलीस दलाची प्रतिमा मलिन करण्याचे कृत्य सवाने याने केल्याने त्याला निलंबित करण्याचा आदेश काढण्यात आला आहे.

Loading...
You might also like