इंदापूर पोलीस ठाण्यातील ‘तो’ पोलीस कर्मचारी निलंबित

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दाखल गुन्हयात मदत करण्यासाठी आणि ते प्रकरण मिटविण्यासाठी 8 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून ते लाच म्हणून स्विकारणार्‍या इंदापूर पोलीस ठाण्यातील पोलिस हवालदाराला निलंबित करण्यात आले आहे. त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ४ जून रोजी रंगेहाथ पकडले होते.

प्रविण निवृत्‍ती सोनवणे (51, रा. पोलिस हवालदार, बावडा चौकी, इंदापूर पोलिस स्टेशन) असे निलंबित करण्यात आलेल्या हवालदाराचे नाव आहे.

गुन्ह्यात मदत करण्यासाठी स्विकारले ८ हजार रुपये

तक्रारदार यांच्याविरूध्द इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्या गुन्हयात मदत करण्यासाठी आणि प्रकरण मिटविण्यासाठी पोलिस हवालदार प्रविण सोनवणे यांनी त्यांच्याकडे 8 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. प्राप्‍त तक्रारीची खातरजमा करण्यात आली. त्यामध्ये पोलिस हवालदार सोनवणे हे लाच मागत असल्याचे निष्पन्‍न झाले. त्यानंतर अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने बावडा पोलिस चौकीच्या समोर सापळा रचला. पोलिस हवालदार सोनवणे यांनी चौकी समोरील वडापाव सेंटरजवळ सरकारी पंचासमक्ष 8 हजार रूपयाची लाच घेतली. त्यानंतर सोनवणे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर त्याच्याविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधिक्षकांनी घेतली गंभीर दखल

याची गंभीर दखल पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांनी घेतली आहे. सोनवणे यांच्याविरोधात गंभीर प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी शासकिय सेवेत अशोभनीय असे भ्रष्ट वर्तन केल्याने त्यांना तात्काळ निलंबित करण्याचे व खातेनिहाय प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक यांनी दिले आहेत.

सिने जगत –

#Video : ‘तशा’ अवस्थेत देखील अभिनेत्री प्रियकांने केला ‘असा’ डान्स, सर्वजण झाले चकित

#MeToo : अभिनेत्री तनुश्री दत्‍ता आणि नाना पाटेकर, आरोप प्रकरणाची मोठी बातमी ; घ्या जाणून

सिंगर नेहा भसीनने शेअर केले तिचे ‘हॉट’ फोटो अन् पहाता-पहाता सोशलवर धुमाकूळ

‘डीप नेक’ ड्रेसमध्ये इलियाना डिक्रूजचा ‘बोल्ड’ वीडियो व्हायरल, दिलकश अदाने चाहत्यांना केले ‘घायाळ’