अँटी करप्शनच्या ट्रॅपची चाहूल लागताच पसार झालेला ‘तो’ कर्मचारी निलंबित

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अँटी करप्शनच्या ट्रॅपची चाहूल लागताच सुसाट पसार झालेल्या पौड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.

पोलीस नाईक योगेश पुरुषोत्तम सवाने असे निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

सवाणे याने तक्रारदाराचा वाहन चालविण्याचा परवाना घेतला होता. त्यानंतर तो परत देण्यासाठी त्याच्याकडे २ हजार ५०० रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती २२०० रुपये स्विकारण्यास तो तयार झाला. त्यानंतर अँटी करप्शनच्या पथकाने ससून रुग्णालय परिसरात सापळा रचला होता. मात्र तक्रारदाराकडून लाच स्विकारताना त्याला अँटी करप्शनच्या ट्रॅपची चाहूल लागल्याने तो लाचेच्या रकमेसह त्याच्या कारसह पसार झाला होता. त्याच्याविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस दलाची प्रतिमा मलिन करण्याचे कृत्य सवाने याने केल्याने त्याला निलंबित करण्याचा आदेश काढण्यात आला आहे.