तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे अनेक फायदे, पोट, लिव्हर आणि किडनी राहते साफ, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – कित्येक लोक सकाळी उठून तांब्याच्या भांड्यातील पाणी पितात. यामुळे शरीरात कॉपर ची कमतरता भासत नाही. शरीरातील आजार तयार करणारे जिवाणू नष्ट होतात.

तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे या भांड्यातील पाण्याचा वास येत नाही. आणी बऱ्याच दिवसासाठी पाणी हे ताजेच राहते. या भांड्यातील पाणी पिल्याने वात, पित्त आणि कफ हे तीनही संतुलित राहतात.

असे म्हटल्या जाते की आधीचे लोक सकाळी उठून दररोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायचे. यामुळे शरीरातील सर्व दोष नाहीसे होतात.

आयुर्वेदानुसार ज्या धातूच्या भांडयात पाणी ठेवले जाते त्या धातूचे गुण सुक्ष्म रित्या पाण्यात उतरतात. ज्या रोगाच्या संदर्भात ते गुण असतात ते नाहीसे करण्याचे काम त्या धातूच्या भांड्यातील पाणी करते.

पोटातील घाण होते साफ
नियमितपणे तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्यास पोटातील घाण नाहीसी होते. हे पाणी संपूर्णपणे ब्याक्टेरिया नाहीसे करते. हे पाणी कमीत कमी ८ तास भांड्यात ठेवावे.

नष्ट होतात विषाणू :
एका अध्ययन अनुसार तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवल्यास अशुद्ध पूर्णपणे नाहीसे होतात. अध्ययन मध्ये असे सांगितले आहे की जर १६ तासापर्यंत जर पाणी ठेवले जास्तीचे विषाणू मारून जातात. या पाण्यातील अमिबा सारखे सर्व जिवाणू नष्ट होतात.

शरीरासाठी आहे कॉपर फायद्याचे.
आयुर्वेदामध्ये तांब्यापासून औषदांचे निर्माण केल्या जाते.हे पोटाचे रोग, ज्वर, अतिसार, पिलिया या सारख्या आजारांवर कमी पडते.

कॅन्सर पासून बचाव.
तांब्याच्या भरण्यात पाणी पिल्यास कॅन्सर पासून बचाव होतो. शरीरावरील बाहेरील आणि आतील घाव लवकर भरल्या जाते.

लिव्हर आणि किडनी ला ठेवते आरोग्यदायी
तसेच हे पाणी लिव्हर आणि किडनीला आरोग्यदायी ठेवते. कोणत्याही प्रकारचे संसर्ग (इन्फेकशन) होत नाही. हे पाणी शरीरातील सफाई करते.

या गोष्टींवर ठेव लक्ष.
लोक हे पाणी पिताना सावध राहतात. जास्तीत जास्त घरांमध्ये तांब्याचा जार किंवा ग्लास मध्ये पाणी ठेवतात. परंतु लक्ष्यात ठेवा की हे साहित्य जमिनीवर ठेऊ नका. या भांड्याची स्वच्छता ठेवली नाही तर अनावश्यक जिवाणू तयार होतात. ते पाणी पिल्यास शरीराचे नुकसान असे करू नका. त्यामुळे योग्य नियोजन करा.