धक्कादायक ! बेड्या घातलेल्या मुलीवर 2 पोलिसांकडून बलात्कार, पण…

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – जेव्हा रक्षकच भक्षक बनतात तेव्हा दाद नेमकी कोणाकडे मागायची हा यक्षप्रश्न सर्वसामान्यांना आणि पीडितांना पडतो. अशीच एक घटना अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये समोर आली असून कोर्टानेही आरोपींना शिक्षा सुनावली नसल्याचे भयानक सत्य समोर आले आहे.

दोन पोलिसांनी एका गुन्ह्यातील संशयित मुलीच्या हातात चक्क हातात बेड्या घालून तिच्यावर बलात्कार केला. एका वाहिनीच्या वृत्तानुसार, बलात्काराच्या आरोपाखाली न्यूयॉर्क पोलिस विभागातील अधिकारी एडी मार्टिन्स आणि रिचर्ड हॉल यांना २५ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली जाऊ शकते. मात्र कोर्टाने त्यांना अशी कडक शिक्षा न सुनावता त्यांना केवळ कामाच्या ठिकाणी गैरवर्तन केल्याबद्दल दोषी ठरवले.

दरम्यान ही लाजिरवाणी घटना पोलिसांनी २०१७ मध्ये घडवून आणली होती. मुलगी म्हणाली की तिला हातकडीने (बेड्या) बांधले गेले होते आणि जबरदस्तीने आत नेले आणि बलात्कार केला. परंतु पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, तिच्या सहमतीने लैंगिक संबंध झाले असून तिला बेड्या वगैरे घातल्या नव्हत्या. या घटनेनंतर न्यूयॉर्कमध्ये एक नवीन कायदा तयार करण्यात आला असून त्याद्वारे कोठडीत असताना एखाद्या व्यक्तीशी लैंगिक संबंध बेकायदेशीर ठरविण्यात आले आहेत.

सादर घटनेमध्ये सुरुवातीला पोलिस अधिका्यांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पण नंतर गुन्हे काढून टाकण्यात आले. आरोपी पोलिसांनी सामंजस्याने काही आरोप स्वीकारले. न्यूयॉर्क राज्याच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना कामाच्या ठिकाणी गैरवर्तन केल्याबद्दल दोषी ठरवले. घटनेच्या वेळी ही मुलगी १८ वर्षांची होती. न्यायाधीश म्हणाले की, पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध महत्त्वपूर्ण पुरावे सापडले आहेत, परंतु पीडितेच्या वक्तव्यावर विश्वासार्हता नसल्यामुळे बलात्काराचा आरोप वगळण्यात आला आहे.

ड्रग रॅकेटवरील कारवाईच्या वेळी पोलिस अधिकारी गुप्त कारवाई करीत होते. यावेळी त्यांनी मुलीला ड्रग्जसह पकडले. पीडित मुलीने या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभे केले असून तिच्या वकिलाने पीडितेवर अन्याय झाला असल्याचे म्हटले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like