युनिसेक्स सलूनमधील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूरमधील मानेवाडयातील तपस्या चौकाजवळील ईराई विहार येथील शाईन युनिसेक्स सलूनवर छापा टाकून सामाजिक सुरक्षा विभागाने हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. दरम्यान, मानेवाडा परिसरात सेक्स रॅकेट चालविणार्‍याला पोलिसांनी अटक केली आहे.
सुनील उर्फ समीर राजू वाहणे (30, रा. यादवनगर, नागपूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी सलूनमध्ये छापा टाकल्यानंतर तेथे सुनिलसह सेक्स रॅकेटमध्ये सामील असणार्‍या 3 महिला देखील आढळुन आल्या आहेत. सलूनमध्ये सेक्स रॅकेट चालू असल्याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली. पोलिसांनी एका बनावट ग्राहकास सलूनमध्ये पाठविले. पोलिसांनी सलूनच्या समोर सापळा रचला. बनावट ग्राहकाकडून इशारा मिळताच पोलिसांनी छापा टाकला. आरोपी वाहणे याची महिला साथीदार संगिता गोपीचंद गजभिये तेथून पळून गेली. संगिता आणि सुनिल वाहणे यांनी मिळुन सलूनमध्ये सेक्स रॅकेट चालु केले होते. सलूनमध्ये येणार्‍या पुरूषांना शरिरसुखाचे आमिष दाखविले जात आणि त्यानंतर त्यांच्याकडून बक्‍कळ रक्‍कम घेवुन त्यांना शरिरसुख दिले जात होते. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) ही कारवाई केली आहे. योगेश घोडके यांच्या फिर्यादीवरून हुडकेश्‍वर पोलिस ठाण्यात वाहणे, संगिता गजभिये यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.