बुलडाण्यात कॉपी करण्याचा नवीन पॅटर्न : ५०० रुपयात Bsc चा पेपर बाहेर

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाईन – शालेय जीवनात कॉपी करून पास होण्याचे प्रकार नवीन नाहीत. अनेक बहाद्दर कॉप्या करण्यात पटाईत असतात. परंतू हे शाळेपूर्तीच मर्यादितच न राहता कॉलेजमध्ये देखील हा प्रकार होत आहे. असाच प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा या ठिकाणी शिवाजी महाविद्यालयात उघड झाला आहे. या महाविद्यालयात पेपर सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासात तेथील प्रश्नपत्रिका बाहेर आली. मात्र नवीन तंत्रज्ञान घडवणारी पिढीचं असे करून पास होणार असेल तर काय करायचे. धक्कादायक बाब म्हणजे येथील प्राध्यापक देखील विद्यार्थ्यांना या प्रकरणी मदत करतात.

राज्यात अनेक महाविद्यालयात असे प्रकार सर्रास दिसून येतात, मात्र या महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात यासारख्या घटना दिसून येतात. या महाविद्यालयात देखील बीएससीची परिक्षा सुरु आहे. यासारख्या प्रकारामुळे प्रचंड मेहनत करून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर यामुळे अन्याय होताना दिसून येत आहे. परीक्षाकेंद्रावर सामूहिक कॉपी चालणे दुदैवी आहे. यात विद्यार्थी, पालक, शिक्षक, केंद्र संचालक हे सर्व एकमेकांवर मेहेरबान असतात. असं आरोप देखील अनेकदा केला जातो. मात्र दुर्दैव हे आहे कि शाळा प्रशासन देखील या गोष्टींना आळा बसण्यासाठी काही करताना दिसून येत नाही.

दरम्यान टक्केवारीचे भूत विद्यार्थी-पालकांच्या मानगूटीवर स्वार झाल्याने उत्तम गुण मिळविण्यासाठी शिक्षकांसह परीक्षार्थ्यांनी शॉर्टकटचा अवलंब केल्याचे जिजा माता परीक्षा केंद्रावर दिसून आले.