कामाची गोष्ट ! ‘कोरोना’पासून ‘बचावा’साठी घरबसल्या बनवा ‘सॅनिटायझर’, खर्च फक्त 50 रुपये, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग दहशतीत आहे. अशात कोरोना विषाणूला टाळण्यासाठी सॅनिटायझर वापरले जात आहे. परंतु यात ओरिजनल कोणते आणि डुप्लीकेट कोणते याबद्दल शंका आहेत. बाजारात सॅनिटायझरचा काळाबाजार चालू असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संसदीय मतदारसंघ वाराणसीत असलेल्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या (बीएचयू) आयआयटीने घरी सॅनिटायझर तयार करण्याची पद्धत सांगितली आहे.

अशा परिस्थितीत घरी बसलेल्या लोकांनासुद्धा कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी सॅनिटायझर बनविण्याचा घरेलू पर्याय मिळाला आहे. त्यांना फक्त काही सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संस्था यांचे समर्थन असणे आवश्यक आहे. बीएचयूच्या बायो मेडिकल विभागाचे असोसिएट प्रोफेसर, डॉ मार्शल धयाल म्हणाले की सुमारे १०० एमएल सॅनिटायझर्स केवळ ५० रुपयांमध्ये तयार करता येतात.

हे घरी बसूनही बनवता येते. यासाठी ९९ टक्के अल्कोहोल, ३० टक्के कोरफड आणि सोडियम हायड्रॉक्साईड यांचे मिश्रण घेऊन मिक्सरमध्ये टाकावे आणि दोन मिनिटांनंतर ते फिल्टर करावे, अशा पद्धतीनं सर्वोत्तम सॅनिटायझर तयार होईल.

का मिक्स करावे कोरफड
त्यात कोरफड यासाठी मिळवतात कारण हात सुकल्यावर पुन्हा पुन्हा कोरडे पडतात. जर कोरफड जेल असले तर ओलावा टिकून राहतो. त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही. या सर्व गोष्टी घरी बनवता येतात आणि ते ही फक्त दोन ते चार मिनिटांमध्येच.

जनजागृतीसाठी सोशल मीडियाचा उपयोग
प्रोफेसर म्हणाले की सोशल मीडियाचा उपयोग जनजागृतीसाठी केला जात आहे. त्याचे व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केले जात आहेत. फेसबुकवर देखील टाकले जात आहेत. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून देखील काही लोकांना जागरूक केले जात आहे. तसेच ते म्हणाले की गरीब वस्तीत वितरीत करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले जाणार आहे. आम्ही त्यांना सांगू की जर त्यांनी आम्हाला कच्चा माल दिला तर आम्ही ते तयार करू आणि बनारसमधील गरीब वस्तींमध्ये विनामूल्य वितरित करू.

तसेच प्रोफेसर यांनी बाजारात सॅनिटायझरचा चाललेला काळाबाजार लक्षात घेता सुमारे दहा लिटर सॅनिटायझर बनवून परिसरात नि:शुल्क वितरित केले आहे. तसेच ते म्हणाले ‘कोरोना विषाणूला घेऊन जास्त काळजी करण्याची आवश्यकता नाही तर जागरूक असणे आवश्यक आहे.’ ते म्हणाले की जर स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संस्था यांनी यासाठी सहकार्य केले तर आम्ही ते मोठ्या प्रमाणात तयार करू शकतो. यासाठी संस्था आम्हाला कच्चा माल पुरवित असल्यास आम्ही त्यांना १००० लीटरपर्यंत विनामूल्य सॅनिटायझर बनवू शकतो. ब्लॅक मार्केटिंग आणि बनावट गोष्टी टाळता येऊ शकतात.

महत्त्वपूर्ण म्हणजे उत्तर प्रदेशातील बर्‍याच रूग्णांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. नवीन रुग्णांना नोएडामध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळल्यानंतर आरोग्य विभागाने बचावासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. योगी सरकारनेही सर्व परीक्षा (सीबीएसई आणि आयसीएसई सोडून) राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था २ एप्रिलपर्यंत बंद ठेवल्या आहेत. या कालावधीत सार्वजनिक दर्शन, समाधान दिन, तहसील दिन व धरणे-प्रदर्शनावरही बंदी घालण्यात आली आहे.