मुतखडा आणि पोटाच्या समस्येवर उपयुक्त ठरते कोथिंबीर ! जाणून घ्या इतर आरोग्यदायी फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – स्वयंपाक कराताना सर्रास वापरली जाणारी कोथिंबीर आपल्या शरीरासाठी खूपच गुणकारी असते. याचा अनेक आजारांसाठी आणि समस्यांसाठी फायदा होतो. आज आपण कोथिंबीर खाण्याचे शरीराला कोणते मोठे फायदे होतात याची माहिती घेणार आहोत.

1) मुतखडा – ज्यांना ही समस्या आहे त्यांनी रोज सकाळी उठल्यानंतर कोथिंबीरीचं पाणी प्यावं. यासाठी कोथिंबीर पाण्यात टाकून ती उकळून घ्यावी. त्यानंतर हे पाणी गाळून रिकाम्या पोटी प्यावं. असं केल्यास हे खडे मुत्रातून बाहेर टाकले जातात.

2) लघवी साफ होण्यास मदत होते – 1 ग्लास पाण्यात 2 चमचे बारीक केलेली धने पावडर घालावी. 5 ते 7 मिनिटे उकळून घेतल्यानंतर ते पाणी गार करावं. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना हे पाणी पिलं तर लघवी साफ होते.

3) पोटाच्या समस्यांपासून सुटका – 2 कप पाण्यात जिरे, कोथिंबीर घालावी. यात चहा पावडर आणि बडीशेप टाकावी. हे मिश्रण 2 मिनिटे गॅसवर ठेवून ते उकळून घ्यावं. आवडीनुसार त्यात साखर आणि आलं घालावं. 2-3 उकळ्या आल्यानंतर हे मिश्रण गाळून प्यावं. यामुळं पचनयंत्रणा सुधारते आण गॅसची समस्या दूर होते.

4) नाकातून होणारा रक्तस्राव थांबतो – कोथिंबीरीच्या 20 ग्रॅम पाण्यात कापूर घालून ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावं. हा रस गाळून घेऊन 2 थेंब नाकपुडीत टाकावेत. हा रस कपाळाला लावून हलक्या हातानं मालिश केली तर नाकातून येणारं रक्त लगेच थांबतं.

5) डोळ्यांची आग कमी होण्यास मदत होते – बडीशेप, साखर आणि धने समप्रमाणात घेऊन ते मिक्सरमधून काढावे. जेवणानंतर ही पावडर 6 ग्रॅम खावी. यामुळं डोळे आणि हातापायांची होणारी आग कमी होते.

6) त्वचेसाठी जास्त फायदेशीर – कोथिंबीर रक्तातील इन्सुलीनची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. कोथिंबीर आणि धन्याच्या वापरानं मधुमेह पूर्णपणे आटोक्यात येण्यास मदत होते. तजेलदार त्वचेसाठी कोथिंबीर जास्त उपयुक्त ठरते.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.