Coriander Seeds | धने वापरल्याने उजळेल चेहरा, रोज करून पहा हा उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Coriander Seeds | त्वचेचा रंग गोरा असो की सावळा असो की गडद असो काही फरक पडत नाही. तुमचा चेहरा किती चमकदार आहे आणि तुमची त्वचा (Skin) किती निरोगी आहे हे महत्वाचे आहे. तुमचा चेहरा (Face) इतरांना भेटताना फर्स्ट इम्प्रेशन असतो. अशावेळी, निर्दोष आणि चमकणारी त्वचा दिसली की तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढतो. चेहर्‍यावर चमक (Glowing Skin) आणण्यासाठी जास्त मेहनत करण्याची आणि वेळ देण्याची गरज नाही. घरगुती उपाय करून तुम्ही घरात असलेल्या घटकांचा वापर करून अगदी कमी खर्चात तुमच्या चेहर्‍यावर नवीन चमक (Glow) आणू शकता. (Coriander Seeds)

 

धन्याच्या वापराने मिळेल निर्दोष त्वचा
अशी चमक मिळवण्यासाठी धने आणि कोथेंबिर त्वचेसाठी फायदेशीर मानली गेली आहे. याच्या वापराने मुरुम, पुरळ, पिगमेंटेशन, ब्लॅक हेड्स आणि कोरडी त्वचेची समस्याही कमी होते.

 

या प्रकारे करू शकता वापर
धन्याचे पाणी टोनर म्हणून वापरू शकता. टोनर बनवण्यासाठी धने रात्रभर पाण्यात भिजवावे. हे पाणी सकाळी गाळून घ्या. आता त्यात गुलाब पाणी (Rose water) आणि लिंबाचा रस (Lemon juice) मिसळा. स्वच्छ स्प्रे बॉटलमध्ये भरून रोज चेहर्‍यावर टोनर म्हणून वापरा. (Coriander Seeds)

 

नॅचरल स्क्रब (Natural scrub)
नॅचरल स्क्रबसाठी संपूर्ण धने हा एक चांगला पर्याय आहे. यामुळे मृत त्वचा निघून जाते आणि चेहर्‍यावरील निस्तेजपणा दूर होतो. त्याचा स्क्रब म्हणून वापर करण्यासाठी धन्याच्या पाण्यात व्हिटॅमिन ई (Vitamin E) कॅप्सूल मिसळा. मैदा किंवा बेसन यांसारखे जे तुमच्या त्वचेला सूट होईल ते कमी प्रमाणात घ्या आणि त्यात धन्याचे पाणी घाला. चेहर्‍यावर लावा आणि हळू हळू स्क्रब करा.

फेसपॅकमध्ये या प्रकारे वापरा

धन्याच्या पाण्यात गरजेनुसार बेसन आणि चिमूटभर हळद (Turmeric) घाला. आता हा पॅक चेहर्‍यावर लावा आणि कोरडा झाल्यावर चेहरा धुवा.

चमकदार त्वचेसाठी कोथिंबीरीची पेस्ट बनवा. त्यात मध (Honey) आणि लिंबू मिक्स करून चेहर्‍यावर लावा आणि अर्ध्या तासानंतर चेहरा धुवा.

तांदळाच्या पिठात ताजी कोथिंबीर बारीक करून मिक्स करा. आता त्यात दही घाला. हा पॅक चेहर्‍यावर लावा. यामुळे चेहर्‍याची चमक वाढण्यासोबतच स्किन टाइट होईल.

 

कोथिंबीर कोरफड जेल
कोथिंबीरमध्ये कोरफड जेल मिसळल्याने देखील चांगले परिणाम मिळतात.
कोथिंबीर बारीक करून त्यात एलोवेरा जेल मिक्स करा. हे जेल चांगले मिसळा आणि चेहर्‍यावर लावा. लवकरच चांगले परिणाम दिसतील.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Coriander Seeds | coriander seeds benefits for skin dhaniya patte beej natural home remedies coriander leaves face pack azup

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Methi And Milk Benefits | मेथीदाणे आणि दूधाच्या सेवनाने शरीराला होतील हे 5 जबरदस्त फायदे, असा करा वापर

 

Cinnamon and lemon benefits | आरोग्यासाठी दालचीनी आणि लिंबूचे फायदे

 

Weird Food Combinations | पपई खाल्ल्यानंतर कधीही खाऊ नका या वस्तू, होऊ शकते जीवघेणे नुकसान