धन्याचे पाणी प्या आणि ‘या’ गंभीर आजारांना पळवून लावा

पोलीसनामा ऑनलाईन टीम – जेवणाची चव वाढवण्यासाठी धने आणि धनेपूड विविध पदार्थांमध्ये वापरली जाते. धन्याचे पाणी नियमित प्यायल्यास अनेक फायदे होतात. धन्यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम शरीराच्या अनेक आरोग्य समस्या दूर करण्यास मदत करतात. धन्याच्या पाण्याचे सेवन केल्यास कोणते फायदे होतात, याविषयी आपण माहिती घेवूयात.

प्रथम धन्याचे पाणी कसे बनवायचे ते पाहू. धन्याचे पाणी बनविण्यासाठी रात्री एक ग्लास कोमट पाण्यात दोन चमचे धना पावडर टाकून ठेवा. हे पाणी सकाळी गाळून प्यावे. धन्याचे पाणी चांगले कोलेस्टेरॉल वाढवतात आणि खराब कोलेस्टेरॉल कमी करते. हे नियमित प्यायल्याने हार्ट डिसिजचा धोका टाळता येतो. धन्याच्या पाण्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी आणि फोलिक अ‍ॅसिड असते. हे नियमित प्यायल्याने रक्ताची कमतरता दूर होते. धन्याच्या पाण्यामध्ये एक विशेष तत्त्व डोडेनल असते. हे टायफॉइड बॅक्टेरिया नष्ट करण्यात अँटिबायोटिक्सपेक्षा दुप्पट जास्त इफेक्टिव्ह असते.

तसेच धन्याच्या पाण्यामधील लिनोलेनिक अ‍ॅसिड स्किन इन्फेक्शन आणि एक्झिमाची समस्येपासून बचाव होतो. धन्याच्या पाण्यामधील एस्कॉर्बिक अ‍ॅसिड नामक अँटिऑक्सिडंट बॉडीची इम्युनिटी वाढवते. यामुळे सर्दी-खोकला आणि व्हायरल इन्फेक्शनचा धोका कमी होतो. विशेष म्हणजे धन्याच्या पाण्यामधील अँटिस्पास्मोडिक प्रॉपर्टीज पीरियड्सच्या वेदना कमी करते. नियमित धन्याचे पाणी प्यायल्याने तोंडाच्या दुर्गंधीची समस्या दूर होते. धन्याच्या पाण्यातील फायबर्स आणि इसेन्शियल ऑइलमुळे लिव्हर डिसिजपासून बचाव होतो. धन्याचे पाणी कोलेजन टिश्यूचे प्रॉडक्शन वाढवते. यामुळे अल्सर सारख्या आजारापासून बचाव होतो. नियमित धन्याचे पाणी प्यायल्याने बॉडीची ग्लुकोज लेव्हल बॅलन्स राहते. यामुळे डायबिटीसची शक्यता कमी होते.