Corona Vaccine : भारत बायोटेकला आपत्कालीन वापरासाठी लवकरच मिळू शकेल मान्यता

पोलीसनामा ऑनलाईन : कोरोना विषाणूविरूद्ध स्वदेशी लस विकसित करणारी हैदराबादची भारत बायोटेक ही कंपनी कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला (डीसीजीआय) एक ते दोन आठवड्यांत अतिरिक्त लस डेटा प्रदान करेल. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) सहकार्याने भारत बायोटेकने ‘कोवॅक्सिन’ नावाची एक लस तयार केली असून आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळावी यासाठी अर्ज केला आहे. कंपनीने लसच्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यासाठी एक हजार स्वयंसेवकांवर याची तपासणी केली. निकाल चांगला आल्यानंतर कंपनी आता देशातील 25 केंद्रांवर तिसरा टप्यात चाचणी घेत आहे. एकूण 26 हजार स्वयंसेवकांवर फेज 26 ची चाचणी घेण्यात येणार आहे. आपत्कालीन वापरास लवकरच मान्यता दिली जाऊ शकते.

एका दिवसापूर्वी कंपनीने म्हटले की, त्यांनी आतापर्यंत 13 हजार स्वयंसेवक तयार केले आहेत. कोवॅक्सिनच्या आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी भारत बायोटेकने 7 डिसेंबर रोजी डीसीजीआयकडे अर्ज केला होता. अर्जासह, कंपनीने लसच्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील सुरक्षा आणि रोगप्रतिकारक डेटा सादर केला. सेंट्रल ड्रग स्टँडर्ड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) च्या तज्ज्ञ पॅनेलने आपल्या कंपनीच्या अर्जावर विचार करण्यासाठी फेज -I च्या चाचणीसाठी आतापर्यंतचा डेटा सादर करण्यास कंपनीला सांगितले होते. दरम्यान, डेटा सबमिट करण्यास एक ते दोन आठवडे लागतील. परंतु, याबाबत सीडीएससीओकडून कोणतीही पुष्टी झालेली नाही.

सीरमने गोळा केला अतिरिक्त डेटा

डीसीजीआयने त्यांच्या लसीसंदर्भात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून अतिरिक्त डेटाही मागविला. सीरमद्वारे अतिरिक्त डेटा सबमिट केला गेला आहे आणि अशी अपेक्षा आहे की या महिन्याच्या अखेरीस त्याच्या लसीच्या तातडीच्या वापरास मान्यता दिली जाईल. अमेरिकन औषधनिर्माण कंपनी फायझरच्या भारतीय युनिटने देखील आपत्कालीन लसीच्या वापरासाठी मंजुरीसाठी अर्ज केला आहे. परंतु त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता कमी आहे कारण त्याने भारतात मनुष्यांवरील लसीची चाचणी घेतली नाही.