‘बिग बीं’च्या आवाजातील ‘ती’ काॅलरट्यून बंद होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना महामारीच्या संकटामध्ये खबरदारी म्हणून काही उपाययोजनांची अंमलबाजवणी केली आहे. त्याचबरोबर लोकांमध्ये जनजागृती होण्यासाठी काेराेनापासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याचा सल्ला बिग बी अमिताभ बच्चन हे प्रत्येक माेबाइल काॅलरला देत असतात. त्यांच्या आवाजामध्ये तशी काॅलरट्यून रेकाॅर्ड करण्यात आली आहे; मात्र आता ही ट्यून बदलण्यात येणार आहे. नव्या काॅलरट्यूनमध्ये बच्चन यांचा आवाज नसेल. नवी काॅलरट्यून लसीकरणावर भर देणारी राहणार असून, लवकरच ती ऐकायला मिळेल.

भारताने उचलली योग्य पावले; आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्तलिना जॉर्जिएन्व्हा यांनी कोरोना साथीची स्थिती व त्यामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट यांचा मुकाबला करण्यासाठी भारताने ठोस व योग्य पावले उचलली आहेत, अशी प्रशंसा केली आहे.
क्रिस्तलिना जॉर्जिएव्हा म्हणाल्या की, कोरोना साथीच्या काळात भारताने ज्या पद्धतीने निर्णय घेतले त्यामुळे त्यांना भविष्यात मोठे आर्थिक संकट जाणवण्याची शक्यता नाही. जगातील आर्थिक स्थितीसंदर्भात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आपला अहवाल २६ जानेवारी रोजी प्रसिद्ध करणार आहे. भारतामध्ये लॉकडाऊनची अंमलबजावणी करणे हा एक धाडसी निर्णय होता. त्यानंतर भारताने टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिलही केले. यावर्षी भारताने अर्थव्यवस्था बळकट होण्यासाठी आणखी पावले उचलावीत, असेही त्यांनी सांगितले.